दूरसंचार विभागाच्या सेवेमुळे ग्राहक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 10:31 PM2019-03-11T22:31:26+5:302019-03-11T22:31:44+5:30

तांदळाची सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या मूल तालुक्यात दूरसंचार विभागाची सेवा ग्राहकांना आता नकोशी झाली आहे. सध्यास्थित दूरसंचार विभागाचे नेटवर्क गायब झाल्याने ग्राहक त्रस्त झाले असुन अनेक ग्राहक दूरसंचार विभागाची सेवा बंद करण्याच्या तयारीत आहेत. दूरसंचार विभागाने सुरळीत सेवा देण्याची मागणी ग्राहकांनी केली आहे.

The service of the Department of Telecommun | दूरसंचार विभागाच्या सेवेमुळे ग्राहक त्रस्त

दूरसंचार विभागाच्या सेवेमुळे ग्राहक त्रस्त

Next
ठळक मुद्देविभागाचे दुर्लक्ष : अनेक दिवस नेटवर्क बंद असल्याने ग्राहक दुसऱ्या सिमच्या शोधात

लोकमत न्यूज नेटवर्क
मूल : तांदळाची सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या मूल तालुक्यात दूरसंचार विभागाची सेवा ग्राहकांना आता नकोशी झाली आहे. सध्यास्थित दूरसंचार विभागाचे नेटवर्क गायब झाल्याने ग्राहक त्रस्त झाले असुन अनेक ग्राहक दूरसंचार विभागाची सेवा बंद करण्याच्या तयारीत आहेत. दूरसंचार विभागाने सुरळीत सेवा देण्याची मागणी ग्राहकांनी केली आहे.
तालुक्यातील शासकीय कार्यालय तथा शालेय महावि़द्यालय मोठ्या प्रमाणावर आहे. मात्र त्यादृष्टीने दुरसंचार विभागाची सेवा पाहिजे त्याप्रमाणात मिळत नाही. यामुळे मूल शहरवासीयांना इंटरनेटसारख्या सेवेपासुन वंचित राहावे लागत आहे. मागील १५ दिवसांपासून मूल तालुक्यात दूरसंचार विभागाचे नेटवर्क गायब झाले आहे. येथील दूरसंचार विभागाचे तत्कालीन अधिकारी यादव यांनी दूरसंचार विभागाची सेवा देण्यासाठी प्रयत्न करून २४ तास सेवेचा लाभ तालुका वासियाना मिळवुन दिला. परंतु यादव यांची बदली होताच सेवा ढेपाळली.
दूरसंचारची सेवा कुचकामी
मूल शहर हे तालुक्याचे ठिकाणी असून गेल्या २७ वर्षांपासून नगरपालिका कार्यरत आहे. याठिकाणी महसुल विभागाचे उपविभाग, उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांचे कार्यालय यासह विविध कार्यालय कार्यरत आहे. परंतु दूरसंचार निगमकडून पाहिजे, त्याप्रमाणवर सेवा मिळत नाही. यामुळे शहरात असलेल्या विविध विभागाच्या कार्यालयांना व व्यापाऱ्यांना इंटरनेट व भ्रमणध्वनी सेवेचा पाहिजे त्याप्रमाणात लाभ मिळत नसल्याने ग्राहकांची ओरड सुरू आहे, दूरसंचार विभागाने सुरळीत सेवा देण्याच्या दुष्टीने प्रयत्न करावा, अशी मागणी माजी नगरसेवक मोतीलाल टहलियांनी यांनी केली आहे.

Web Title: The service of the Department of Telecommun

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.