ध्येय ठरवून परीक्षेची तयारी करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 12:03 AM2018-01-15T00:03:58+5:302018-01-15T00:04:41+5:30
स्पर्धा परीक्षेची तयारी करताना परिक्षार्थ्यांने आपल्या परिस्थितीचा विचार न करता, विशिष्ट ध्येय ठरवूनच सातत्यपूर्ण अभ्यास करावा, त्यातून यशाचा मार्ग सुकर होत असतो, असे प्रतिपादन जिल्हा परिषदचे मुख्य कार्यपालन अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले.
आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : स्पर्धा परीक्षेची तयारी करताना परिक्षार्थ्यांने आपल्या परिस्थितीचा विचार न करता, विशिष्ट ध्येय ठरवूनच सातत्यपूर्ण अभ्यास करावा, त्यातून यशाचा मार्ग सुकर होत असतो, असे प्रतिपादन जिल्हा परिषदचे मुख्य कार्यपालन अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले.
शहरातील तुकूम परिसरातील आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृहात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर, परिसंवाद व सांस्कृतिक कार्यक्रम नुकताच पार पडला. यावेळी ते उद्घाटनीय स्थानावरु ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रकल्प अधिकारी ई. बावणकर मार्गदर्शक म्हणून डीआयसीईचे डॉ. पुष्पक पांडव, उपजिल्हाधिकारी कल्पना निळ, कर विभागाचे निरिक्षक रमे ढुबे आदी उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना उपजिल्हाधिकारी कल्पना निळ म्हणाल्या, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना योग्य नियोजन करुन अभ्यास करावा, त्यातून यश मिळते. यावेळी त्यांनी आपल्या जिवनातील विविध प्रसंग सांगून अभ्यासाबाबत मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. पुष्पक पांडव, व प्रकल्प अधिकारी बावणकर यांनी मार्गदर्शन केले.
त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. त्यामध्ये गोंडी नृत्य, पथनाट्य, नाटक, नकल, लावणी आदी स्पर्धा पार पडल्या. सांस्कृतिक कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अॅड. लालसू नागोरी तर प्रमुख पाहुणे म्हणून बेलेकर, सिसोदे, फुलकटवार, दीक्षीत, दांभाडे आदी उपस्थित होते. यावेळी वसतिगृहाचे लिपिक बगडे यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार करण्यात आला. त्यानंतर क्रीडा स्पर्धा व विविध सांस्कृतिक स्पर्धेचे बक्षिस वितरण कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे आभार फुलकटवार यांनी मानले. यावेळी पुरुषोत्तम मसराम, शंकर चौखे, मनोज तलांडे, विनोद मगेर, सचिन सिडाम, अनिल मडावी, दिनेश धारणे, शितल सयाम, माधुरी मेश्राम, माधुरी गायकवाड आदी उपस्थिती होती.