भेजगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्र उभारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:21 AM2021-06-06T04:21:51+5:302021-06-06T04:21:51+5:30
सरपंचांची पालकमंत्र्यांकडे मागणी भेजगाव : मूल तालुक्यातील राजकीयदृष्ट्या संवेदनशील म्हणून ओळख असलेल्या भेजगाव हे परिसरातील २० गावांच्या केंद्रस्थानी आहे. ...
सरपंचांची पालकमंत्र्यांकडे मागणी
भेजगाव : मूल तालुक्यातील राजकीयदृष्ट्या संवेदनशील म्हणून ओळख असलेल्या भेजगाव हे परिसरातील २० गावांच्या केंद्रस्थानी आहे. त्यामुळे येथे प्राथमिक आरोग्य केंद्र उभारावे, अशी मागणी सरपंच अखिल गांगरेड्डीवार यांनी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे केली आहे.
सद्य:स्थितीत भेजगाव हे बेंबाळ प्राथमिक आरोग्य केंद्रात समाविष्ट आहे. भेजगावपासून मूल व बेंबाळ ही दोन्ही आरोग्य केंद्रे १० ते १२ किलोमीटर अंतरावर आहेत. या आरोग्य केंद्रात जवळपास ४० गाव समाविष्ट आहेत. त्यामुळे आरोग्य व्यवस्था तोकडी पडत आहे. रात्री बेरात्री या परिसरातील नागरिकांना जीव धोक्यात घालून उपचारार्थ मूलला जावे लागते. भेजगाव ग्रामपंचायतीची लोकसंख्या पाच हजारांच्या वर असल्याने व परिसरातील २० गावांचा समावेश होत असल्याने आरोग्याच्या दृष्टीने बेंबाळ प्राथमिक आरोग्य केंद्राचे विभाजन करून भेजगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करावे, अशी मागणी येथील सरपंच अखिल गांगरेड्डीवार यांनी ना. वडेट्टीवार यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
===Photopath===
050621\img-20210604-wa0008.jpg
===Caption===
पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांना निवेदन देताना सरपंच अखिल गांगरेड्डिवार