सेवादासनगर जि. प. शाळेत शिक्षकांचीच दांडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 04:42 AM2020-12-16T04:42:18+5:302020-12-16T04:42:18+5:30
शासनाने ५० टक्के शिक्षकांना दररोज शाळेवर उपस्थित राहणे बंधनकारक केले. रोटेशननुसार शिक्षकांच्या नेमणुका शाळेवर केली जात आहे. त्यानुसार जिवती ...
शासनाने ५० टक्के शिक्षकांना दररोज शाळेवर उपस्थित राहणे बंधनकारक केले. रोटेशननुसार शिक्षकांच्या नेमणुका शाळेवर केली जात आहे. त्यानुसार जिवती पंचायत समिती अंतर्गत वणी बुजरूक केंद्रातील सेवादासनगर जि. प. शाळेत सोमवारी शिक्षक अजिरजा शाबानअली अजाणी व वासुदेव कोडापे हे कर्तव्यावर राहणे बंधनकारक होते. मात्र केंद्र प्रमुखांनी शाळेची भेटी घेतली असता दोन्ही शिक्षक अनधिकृत गैरहजर आढळून आले तर शाळा बंद होती. यावेळी शाळा समितीचे अध्यक्ष माधव राठोड व सुशीला पवार, उद्धव राठोड, अनिता आडे तसेच ग्रामस्थांनी हे शिक्षक शाळेत अनियमित येत नाहीत, असा आरोप केला आहे.
कोट
सेवादास येथील जि. प. शाळेला सोमवारी भेट दिली. दोनही शिक्षक गैरहजर होते. शाळा व्यवस्थापन समितीनेही माझ्याकडे तक्रार केली. ही माहिती शिक्षण विभागातील वरिष्ठांकडे सादर केली आहे.
-सुधाकर चंदनखेडे, केंद्र प्रमुख, वणी (बू)