सेवादासनगर शाळेत वर्ग सात गुरुजी एकच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 11:16 PM2018-07-30T23:16:20+5:302018-07-30T23:16:56+5:30
शाळाबाह्य मुलांची गळती थांबविण्यासाठी आणि गोरगरिबांच्या मुलांना गावातच मोफत शिक्षण मिळावे म्हणून शासनाने गाव तिथे शाळा उघडल्या, परंतु शिक्षण विभागाच्या नियोजनशून्यतेमुळे पहाडावरिल अनेक शाळांमध्ये शिक्षकांची बोंब आहे. याचा फटका विध्यार्थ्यांना बसत आहे. शैक्षणिक सत्र सुरू होऊन महिना लोटला. सेवादासनगर शाळेला शिक्षकच मिळाले नाही. शिक्षण विभागाने तातडीने लक्ष देऊन शाळेतील शिक्षकांच्या रिक्त जागा भराव्या यासाठी सेवादासनगरच्या सरपंच विमल किशन राठोड यांच्या शिष्टमंडळासह जि.प. कार्यकारी अधिकारी यांनी भेट घेऊन शाळेची कैफियत मांडली.
Next
ठळक मुद्देसांगा कसे शिकायचे ? : पहाडावर शिक्षणाचा खेळखंडोबा
<p>लोकमत न्यूज नेटवर्कजिवती : शाळाबाह्य मुलांची गळती थांबविण्यासाठी आणि गोरगरिबांच्या मुलांना गावातच मोफत शिक्षण मिळावे म्हणून शासनाने गाव तिथे शाळा उघडल्या, परंतु शिक्षण विभागाच्या नियोजनशून्यतेमुळे पहाडावरिल अनेक शाळांमध्ये शिक्षकांची बोंब आहे. याचा फटका विध्यार्थ्यांना बसत आहे. शैक्षणिक सत्र सुरू होऊन महिना लोटला. सेवादासनगर शाळेला शिक्षकच मिळाले नाही. शिक्षण विभागाने तातडीने लक्ष देऊन शाळेतील शिक्षकांच्या रिक्त जागा भराव्या यासाठी सेवादासनगरच्या सरपंच विमल किशन राठोड यांच्या शिष्टमंडळासह जि.प. कार्यकारी अधिकारी यांनी भेट घेऊन शाळेची कैफियत मांडली.
तेलंगणा-महाराष्ट्र सीमेलगत असलेल्या सेवादासनगरच्या जिल्हा परिषद शाळेत सातव्या वर्गापर्यंत शाळा आहे. ५६ विद्यार्थी या शाळेत शिक्षणाचे धडे गिरवित आहे. शाळेचे सत्र सुरू होताना नवीन दोन शिक्षक रुजू झाले. त्यापैकी एक शिक्षक आजारी रजेवर गेला. तेव्हापासून तो शाळेत रूजु झालाच नाही. त्यामुळे एकाच शिक्षकाला सात वर्गाचा भार सांभाळण्याची पाळी तर आलीच, परंतु त्यात बिएलओच्या कामाची भर पडली.
सकाळी १० वाजतापर्यंत बिएलओचे काम करणे आणि नंतर शाळा उघडणे, असा त्या शिक्षकाचा दिनक्रम आहे. यामुळे गुरुजी असूनही ते विद्यादान करून शकत नसल्याचे चित्र आहे.
जिवती तालुक्यावरच अन्याय
यावर्षी शिक्षकांच्या आॅनलाईन बदल्या करण्यात आल्या आणि आता ही प्रक्रिया सुध्दा पूर्ण झाली आहे. मात्र जिवती तालुक्यात अजूनही शिक्षक मिळाले नाही. जिवती पंचायत समितीत आधीच ५२ विषय शिक्षकांची पदे रिक्त होती. आता त्यात पुन्हा ४२ शिक्षकांच्या जागा रिक्त झाल्या आहे. दोन शिक्षक अतिरिक्त आहेत. यामुळे ग्रामीण भागातील शाळा आता शिक्षकाविना ओस पडताना दिसत आहे.