कोरपना येथून होतेय सात उद्योगांचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:27 AM2021-05-23T04:27:07+5:302021-05-23T04:27:07+5:30

कोरपना : कोरोना पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या दुसऱ्या टप्प्यातील लाॅकडाऊनमुळे कोरपना येथून सात उद्योगांचे दर्शन स्पष्टपणे होत आहे. त्यामुळे अविस्मरणीय ...

Seven industries are seen from Korpana | कोरपना येथून होतेय सात उद्योगांचे दर्शन

कोरपना येथून होतेय सात उद्योगांचे दर्शन

googlenewsNext

कोरपना : कोरोना पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या दुसऱ्या टप्प्यातील लाॅकडाऊनमुळे कोरपना येथून सात उद्योगांचे दर्शन स्पष्टपणे होत आहे. त्यामुळे अविस्मरणीय पर्वणी नागरिकांना बघायला मिळत आहे.

लाॅकडाऊनमुळे परिसरातील प्रदूषणात मोठ्या प्रमाणात घट आली आहे.

मागील वर्षी लावण्यात आलेल्या कोरोना लाॅकडाऊननंतर यंदा ही पर्वणी अनुभवयास मिळते आहे. यात घुग्घुस येथील एसीसी सिमेंट, गोवारी पारडी येथील डोलोमाइन्स, नारंडा येथील दालमिया सिमेंट, मुकुटबन येथील एमपी बिर्ला सिमेंट, आवारपूर येथील अल्ट्राटेक, गडचांदूर येथील माणिकगड, उपरवाही येथील अंबुजा सिमेंट उद्योगाचे दर्शन होत आहे. लाॅकडाऊनमुळे बरेच छोटे- मोठे उद्योग व रस्त्यावरील दुचाकी चारचाकी यांची वाहतूक बंद आहे. त्यामुळे प्रदूषणाचे प्रमाण कमी झाले आहे. याचा फायदा हवामान स्वच्छ झाले आहे. परिणामी धुळीचे प्रदूषण कमी झाले आहे. शुद्ध हवाही खेळती झाली आहे. अधूनमधून पडणाऱ्या पावसाच्या अलगद सरीमुळे झाडांनाही पालवी फुटली आहे. त्यामुळे आल्हाददायक वातावरणाची निर्मिती परिसरात झाली आहे.

Web Title: Seven industries are seen from Korpana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.