प्रश्नमंजुषा स्पर्धेत सात हजार विद्यार्थ्यांचा सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:35 AM2021-02-25T04:35:36+5:302021-02-25T04:35:36+5:30
फोटो बल्लारपूर: भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा बल्लारपूरच्यावतीने आयोजित प्रश्नमंजुषा स्पर्धेत बल्लारपूर तथा बामणी येथील एकूण ३३ विद्यालय आणि ...
फोटो
बल्लारपूर: भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा बल्लारपूरच्यावतीने आयोजित प्रश्नमंजुषा स्पर्धेत बल्लारपूर तथा बामणी येथील एकूण ३३ विद्यालय आणि महाविद्यालयांमधील सुमारे सात हजार विद्यार्थ्यांनी भाग घेऊन आपल्यातील सामान्यज्ञानाची परीक्षा दिली. त्यात विजेत्यांना ५ हजार ५५५, ३ हजार ३३३ व १ हजार १११ रुपये असे बंपर बक्षीस देण्यात आले.
या प्रश्नमंजुषेत छत्रपती श्री शिवाजी महाराजांची कारकिर्दीत तसेच चंद्रपूर जिल्ह्याचा इतिहास आणि विद्यमान सामाजिक, भौगोलिक यावर ज्ञानात भर टाकणारे प्रश्न विचारण्यात आले होते. स्पर्धा वर्ग ५ ते ८ आणि वर्ग ९ ते १२ अशा दोन गटांकरिता होती. त्यात गटातून प्रथम डॉली रामचंद्र निषाद (वैभव कॉन्व्हेंट, बल्लारपूर), द्वितीय श्रेय रामचंद्र बडकेलवार (दिलासाग्राम कॉन्व्हेंट, बल्लारपूर), तृतीय ऋतुजा विनोद कुडे (गुरूनानक पब्लिक स्कूल, बल्लारपूर) ‘ब’ गटातून प्रथम टीना रामचंद्र परसुटकर (आयडियल इंग्लिश स्कूल, बल्लारपूर), द्वितीय मोहिनी प्रकाश साळवे (श्री बालाजी हायस्कूल, बामणी), तृतीय साहिल केसकर (महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय, बल्लारपूर) हे विद्यार्थी विजयी ठरले. बक्षीस वितरण माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते येथे झाले. याप्रसंगी भाजप जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, नगराध्यक्ष हरिष शर्मा, डॉ. मंगेश गुलवाडे, प्रदेश भाजप महासचिव अजय दुबे, राजू दारी, गुलशन शर्मा आदींची उपस्थिती होती. प्रास्ताविक व संचालन भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे व धर्मप्रकाश दुबे यांनी केले. स्पर्धेकरिता मिथिलेश पांडे, आदित्य शिंगाडे, प्रतीक बारसागडे, संजय बाजपेई, मोहित डंगोरे, किशोर मोहुर्ले, येलय्या दासरफ, मौला नीषाद, मनीष रामीला, विशाल शर्मा, रींकु गुप्ता, गुलशन शर्मा, मनीष मिश्रा, राहुल कावळे, शिवाजी चांदेकर, महेश श्रीरंग, ओम पवार, केतन शिंदे, राहुल बिसेन, सचिन शेंडे, सतीश कनकम, प्रकाश दोतपेल्ली, सुधाकर पारधी, अशोक सोनकर, प्रचलित धणरे, अभिषेक सतोकर आदींनी परिश्रम घेतले.