अवैध रेतीचे सात ट्रॅक्टर जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 12:25 AM2017-09-28T00:25:27+5:302017-09-28T00:25:39+5:30

रेती घाटावरून अवैधरित्या रेतीचा उपसा करून वाहतूक करणाºया एकूण ७ ट्रॅक्टर जप्त करण्यात आले. ट्रॅक्टरच्या मालकांवर दंडात्मक कारवाई केल्याची घटना बुधवारी भद्रावती येथे करण्यात आली.

Seven tractors of illegal sand are seized | अवैध रेतीचे सात ट्रॅक्टर जप्त

अवैध रेतीचे सात ट्रॅक्टर जप्त

googlenewsNext
ठळक मुद्देभद्रावती येथे कारवाई : प्रत्येकी १७ हजारांचा दंड

लोकमत न्यूज नेटवर्क
भद्रावती : रेती घाटावरून अवैधरित्या रेतीचा उपसा करून वाहतूक करणाºया एकूण ७ ट्रॅक्टर जप्त करण्यात आले. ट्रॅक्टरच्या मालकांवर दंडात्मक कारवाई केल्याची घटना बुधवारी भद्रावती येथे करण्यात आली.
भद्रावती शहरातून नेहमीच अवैधरित्या रेतीची वाहूतक मोठ्या प्रमाणात होत असते. नव्यानेच रूजू झालेले तहसीलदार महेश शिताळे यांनी आपल्या पथकाच्या साहायाने ७ ट्रॅक्टर जप्त करून ट्रॅक्टर मालक विजय देवतळे, प्रभाकर लिपटे, सुयोग भोयर, आकाश वानखेडे, प्रकाश राजकोट यांच्यावर दंडात्मक कारवाई केली. यातील काहीच्या दोन ट्रॅक्टरचा समावेश आहे.
या सातही ट्रॅक्टरवर प्रत्येकी १७ हजार प्रमाणे १ लाख १९ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. कारवाई अहवाल उपविभागीय अधिकारी यांच्याकडे पाठविल्याचे तहसीलदार शितोळे यांनी सांगितले.
सावलीतही तीन ट्रक पकडले
सावली : वैनगंगा नदीच्या साखरी घाटातून अधिकृत परवान्याने मोठ्या प्रमाणात रेतीची वाहतूक सुरू आहे. मात्र याच वाहतुकी दरम्यान प्रमाणापेक्षा जास्त रेती वाहुन नेत असल्याचा संशय सावली पोलिसांना आल्याने बुधवारी तीन ट्रक ताब्यात घेवून दंडात्मक कारवाई करण्यात आली. साखरी घाटातील रेती गडचांदूर येथे नेल्या जात होती. वाहतूक परवान्यात चार ब्रासची क्षमता असताना त्यापेक्षा जास्त रेती असल्याचे आढळून आले. त्यामुळे एमएच ३४ एबी ३०७०, एमएच ३४ टी ५२३, एमएच ३४ एम ९३७० या क्रमांकाचे तीन ट्रक जप्त करण्यात आले. ही कारवाई सावलीचे ठाणेदार स्वप्नील धुळे यांच्यासोबत सहायक पोलीस निरीक्षक शेख, दर्शन लाटकर, अनुप कवठेकर, चंद्रशेखर सिडाम, राजू केवट, प्रफुल्ल आडे, शुभांगी भांडेकर, कविता निखाडे यांनी केली. पोलिसांनी कारवाई करून तहसीलदार उषा चौधरी यांच्याकडे ट्रक सुपुर्द केले. महसूल विभागाने ट्रक मालकांवर २७ हजार रूपयांचा दंड ठोठावला आहे.

Web Title: Seven tractors of illegal sand are seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.