पळसगाव-तोरगाव राज्य महामार्गाने सात गावे प्रभावित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 05:00 AM2020-12-25T05:00:00+5:302020-12-25T05:00:47+5:30

सिंदेवाही तालुक्यातील पळसगाव येथून या राज्य महामार्गाची सुरूवात होते आणि ब्रम्हपुरी तालुक्यात तोरगावपर्यंत हा राज्य महामार्ग जातो. यानंतर भंडारा जिल्ह्याची सीमा येथून जवळच आहे. ५२ किलोमीटर लांबीच्या या राज्य महामार्गास दोन वर्षापूर्वीच मान्यता मिळाली होती. मागील वर्षीपासून या राज्य महामार्गाचे कामही सुरू झाले आहे. सद्यस्थितीत गावातील काम वगळून या राज्य महामार्गाचे काम सुरू आहे.

Seven villages affected by Palasgaon-Torgaon state highway | पळसगाव-तोरगाव राज्य महामार्गाने सात गावे प्रभावित

पळसगाव-तोरगाव राज्य महामार्गाने सात गावे प्रभावित

Next
ठळक मुद्देअनेक घरांचे होणार नुकसान

घनश्याम नवघडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागभीड : पळसगाव - तोरगाव या नवनिर्मित राज्यमहामार्गानेमहामार्गात येणारी नागभीड तालुक्यातील सात गावे प्रभावित होणार आहेत. यातील अतिप्रभावित गावांसाठी बायपास मार्ग अतिशय आवश्यक आहे. नाही तर मार्गात येणाºया या गावातील घरे तुटणार आहेत. 
सिंदेवाही तालुक्यातील पळसगाव येथून या राज्य महामार्गाची सुरूवात होते आणि ब्रम्हपुरी तालुक्यात तोरगावपर्यंत हा राज्य महामार्ग जातो. यानंतर भंडारा जिल्ह्याची सीमा येथून जवळच आहे. ५२ किलोमीटर लांबीच्या या राज्य महामार्गास दोन वर्षापूर्वीच मान्यता मिळाली होती. मागील वर्षीपासून या राज्य महामार्गाचे कामही सुरू झाले आहे. सद्यस्थितीत गावातील काम वगळून या राज्य महामार्गाचे काम सुरू आहे. हा राज्य महामार्ग नागभीड तालुक्यातील जीवनापूर, उश्राळमेंढा, बागलमेंढा, मिंथूर, पारडी (ठवरे), किरमिटी आणि पान्होळी या गावांच्या ऐन मध्यवर्ती भागातून गेला आहे.
हा राज्य महामार्ग नागभीड तालुक्यातील या सात गावांच्या ऐन मध्यवर्ती भागातून गेला असल्याने महामार्गाच्या दुतर्फा असलेली घरे पडणार असल्याची भीती गावकºयांच्या मनात निर्माण झाली आहे. गावाच्या बाहेरील रस्ता डांबराचा राहणार असून गावातील रस्ता सिमेंट काँक्रिटचा राहणार आहे. रस्त्याची रूंदी  सात मीटर राहणार असल्याची माहिती आहे. जुना रस्ता पाऊणे चार मीटर रूंदीचा असल्याने गावातील अधिकाधिक घरे तुटण्याची शक्यता आहे.
गावरस्ता लक्षात घेऊन उभारली घरे
गावकºयांनी अतिशय मेहनतीने आणि पै पैसा जमा करून आपली घरे उभारली आहेत. घर हे त्यांचे स्वप्न आहे. उल्लेखनीय बाब ही की गावकºयांनी ही घरे त्यावेळी गावातील गावरस्ता लक्षात घेऊन उभारली आहेत. येथून कधी राज्य महामार्ग जाईल, अशी कल्पनाही कधी गावकºयांनी केली नव्हती. त्यांना राज्य महामार्गाची कल्पना असती तर कदाचित रस्त्याच्या बाजूने जागा सोडून घराची उभारणी केली असती. गावातील घरांना नुकसान पोचू नये यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन एकतर बायपास रस्त्याची मागणी रेटून धरावी नाही तर रस्त्याची रूंदी ‘जैसे थे’ ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी गावकºयांची मागणी आहे.

 

Web Title: Seven villages affected by Palasgaon-Torgaon state highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.