स्वातंत्र्यसंग्राम सैनिकाच्या लेखनीतून साकारतोय शहीद ‘बाल्या ढीवर’
By admin | Published: July 9, 2016 01:13 AM2016-07-09T01:13:00+5:302016-07-09T01:13:00+5:30
भारतावर दिडशे वर्षे राज्य करणाऱ्या इंग्रजाची जुलमी राजवट देशातील लहाण्यापासून वृद्धापर्यंत परिचीत असून ....
मिंझरी येथील पहिला शहीद : १८ नोव्हेंबर १९२९ ला लटकवले होते फासावर
राजकुमार चुनारकर चिमूर
भारतावर दिडशे वर्षे राज्य करणाऱ्या इंग्रजाची जुलमी राजवट देशातील लहाण्यापासून वृद्धापर्यंत परिचीत असून या जुलमी राजवटीचे नावही काढल्यास चिमूरकरांच्या अंगावर काटा उभा राहतो. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात देशात मोठे योगदान देणाऱ्या चिमूर शहरात तथा परिसरात अनेक शहीद वीरांच्या अर्धांगिनी व स्वत: स्वातंत्र संग्राम सैनिक जिवंत आहेत. त्यापैकी ९३ वर्षीय स्वातंत्र संग्राम सैनिक दामोधर लक्ष्मण काळे (गुरुजी) यांच्या लेखनीतून चिमूर तालुक्यातील दीडशे लोकसंख्या असलेल्या मिंझरी येथील पहिला शहीद ‘बाल्या ढीवर’ यांचा इतिहास साकारणार आहे.
भारताच्या स्वातंत्र लढ्यात चिमूर शहराचे योगदान मोठे आहे. १६ आॅगस्ट १९४२ चा स्वातंत्र संग्राम लढ्यात चिमुरातील अनेक स्वातंत्र विरांनी व महिलांनी मोठ्या संख्येत सहभाग घेतला. चिमूरच्या स्वातंत्र लढ्यात अनेक जुलमी इंग्रज अधिकाऱ्यांचे मुद्दे पाडण्यात आले व इंग्रजाची सत्ता उलथवून लावली व देशात प्रथम तिन दिवस स्वातंत्र उपभोगले. त्यामुळे चिमूर शहराचे नाव देशात अजरामर आहे.
१६ आॅगस्ट १९४२ च्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये चिमूर येथील बहिनीकडे आलेल्या युवा अवस्थेतील लक्ष्मण काळे यांनी स्वातंत्र लढ्यात सहभाग घेत चिमूरकरांना इंग्रजाच्या राजवटीतून मुक्त केले. यानंतर काळे गुरुजींनी अनेक आंदोलने चिमूर जिल्ह्याची मागणी शासन दरबारी रेटून धरली आहे. जेव्हा-केव्हा चिमूर जिल्हा होईल, तेव्हा काळे गुरुजी यांचे नाव इतिहासात कोरले जाणार आहे.
स्वातंत्र संग्राम सैनिक काळे गुरुजी यांच्या लेखनीतून आता वयाच्या ९३ व्या वर्षी चिमूर तालुक्यातील मिंझरी (मुरपार) या गावातील तालुक्यातील पहिला शहीद ‘बाल्या ढीवर’ याचे आत्मचरित्र असलेले पुस्तक येत्या १६ आॅगस्टला स्वातंत्र संग्राम लढ्याच्या दिवशी प्रकाशित करण्यात येणार आहे. तालुक्यातील पहिला शहीद बाल्या ढिवर यांना १८ नोव्हेंबर १९२९ ला उमरेड येथील किल्ल्यावर इंग्रजांनी फासावर लटकवले.
याच तालुक्यातील दिडशे लोकसंख्या असलेल्या मिंझरी (मुरपार) गावातील बाल्या ढीवर हा चिमूर तालुक्यातील पहिला शहीद ठरला आहे. या शहीद बाल्या ढिवराचे आत्मचरित्र चिमूर स्वातंत्र संग्राम स्वातंत्र लढ्यातील सैनिक काळे गुरुजी यांच्या लेखनीतून ‘शहीद बाल्या ढीवर’ हे पुस्तक साकारणार आहे.