शंकरपूर जि. प. गटात सात काँग्रेस, तर पाच ग्रामपंचायतींवर भाजपचे वर्चस्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:31 AM2021-02-09T04:31:19+5:302021-02-09T04:31:19+5:30
यामध्ये कवडशी देश. सरपंचपदी सुप्रिया बगडे, तर उपसरपंचपदी चंद्रकांत देशमान्य, जवराबोडी येथे सरपंचपदी वैशाली ठाकरे, उपसरपंचपदी अमोल सावसाकडे, किटाळी ...
यामध्ये कवडशी देश. सरपंचपदी सुप्रिया बगडे, तर उपसरपंचपदी चंद्रकांत देशमान्य, जवराबोडी येथे सरपंचपदी वैशाली ठाकरे, उपसरपंचपदी अमोल सावसाकडे, किटाळी मक्ता येथे सरपंचपदी मनीषा चौधरी, तर उपसरपंचपदी वैशाली चौधरी यांची वर्णी लागली. डोमा येथे सरपंचपदी अल्का ठाकरे, तर उपसरपंचपदी विकास नन्नावरे, वाकर्ला येथे सरपंचपदाच्या आरक्षणाचा उमेदवार नसल्याने हे पद रिक्त ठेवण्यात आले. उपसरपंचपदी दिनकर सिंगारे यांची निवड करण्यात आली. साठगाव येथे सरपंचपद रिक्त ठेवण्यात आले. भाजपच्या पाठिंब्याने उपसरपंचपदी काँग्रेसच्या प्रीती दीडमुठे यांची निवड झाली. चिचाळा कुणबी येथील सरपंचपदी मनीषा ढोरे, तर उपसरपंचपदी उमेश राऊत यांची निवड झाली. या ग्रामपंचायतीवर काँग्रेसचे वर्चस्व प्रस्थापित झाले आहे.
भाजपने चार ग्रामपंचायतीवर झेंडा फडकविला. यामध्ये कवडशी डाक सरपंचपदी शुभम ठाकरे, तर उपसरपंचपदी प्रज्ञा तिवाडे, मांगलगाव येथे सरपंचदी प्रफुल्ल कोलते, उपसरपंचपदी कल्पना ढोणे, चकजाटेपारच्या सरपंचपदी रामकला चौधरी, तर उपसरपंचपदी अतुल चौधरी, कोलारी येेथील सरपंचपद रिक्त ठेवण्यात आले. उपसरपंचपदी दीप्ती बोकडे यांची वर्णी लागली. हिवरा येथील ग्रामपंचायत सदस्य अविरोध निवडून आले होते. सरपंचपदी भाजपचे दुर्योधन लाखे, तर उपसरपंचपदी काँग्रेसचे सुनील कोलमडवार यांची निवड अविरोध झाली. ग्रामस्थ ही ग्रामपंचायत अविरोध झाल्याने ही अपक्षाची सत्ता असल्याचे सांगत आहे.