‘ती’ २३ गावे कोरोना प्रादुर्भावापासून दूरच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:19 AM2021-06-11T04:19:41+5:302021-06-11T04:19:41+5:30

पॉझिटिव्ह स्टोरी जयंत जेनेकर कोरपना : कोरोनाचा जगभरात प्रादुर्भाव पसरला असताना, कोरपना तालुक्यातील २३ गावांत कोरोनाचा एकही रुग्ण आढळून ...

'She' 23 villages far from corona outbreak! | ‘ती’ २३ गावे कोरोना प्रादुर्भावापासून दूरच!

‘ती’ २३ गावे कोरोना प्रादुर्भावापासून दूरच!

googlenewsNext

पॉझिटिव्ह स्टोरी

जयंत जेनेकर

कोरपना : कोरोनाचा जगभरात प्रादुर्भाव पसरला असताना, कोरपना तालुक्यातील २३ गावांत कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आला नाही. परिणामी आजही ही गावे कोरोनापासून दूरच आहेत.

११३ गावे असलेला कोरपना हा औद्योगिकदृष्ट्या विकसित तालुका म्हणून ओळखला जातो. या तालुक्यात आजतागायत तीन हजार ९३५ पाॅझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहे. यात ७५ व्यक्तींचा मृत्यूसुद्धा झाला आहे. असे असताना, गावा-गावात कोरोना प्रादुर्भाव वाढत असताना, चिंचोली, झोटिंग, मायकलपूर, आसन, लालगुडा, रामपूर, निजामगोंदी, इरई, कारवाई, गोपालपूर, टांगाला, जांभूळधरा, चोपण, तुळशी, मांगलहिरा, उमरहिरा, थिप्पा, शिवापूर, कोठोडा खू, रायपूर, कमलापूर, सिंगार पठार, भरकीगुडा आदी गावांतील ग्रामस्थांनी ''माझे कुटुंब, माझी जबाबदारी'' ओळखून सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळत कोरोनाला गावापासून दूर राखण्यात यश मिळवले आहे. त्यामुळे अन्य गावातील नागरिकांना सकारात्मकतेची ऊर्जा या गावापासून प्राप्त होते आहे.

बॉक्स

चाचण्याही मुबलक

तालुक्यात १४ हजार ५० ॲंन्टिजन, १३ हजार १८५ आरटीपीसीआर चाचण्या झाल्या असून, ४५ वयोगटावरील २० हजार १५३, १८ वयोगटावरील १३०२ असे २१ हजार ४५५ व्यक्तींचे लसीकरण झाले आहे. यासाठी कोरपनाचे तहसीलदार महेंद्र वाकलेकर, गटविकास अधिकारी बाबाराव पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर स्वप्नील टेंभे, कोरपना, गडचांदूर ग्रामीण रुग्णालय, मांडवा, नारंडा, कवटाळा प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी, पोलीस, ग्रामपंचायत, नगरपंचायत व नगरपरिषदेचे कर्मचारी यांनी कसोशीने जबाबदारी निभावली आहे.

Web Title: 'She' 23 villages far from corona outbreak!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.