‘ती’ कीटकनाशके बनावट?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2018 11:28 PM2018-08-26T23:28:26+5:302018-08-26T23:29:06+5:30

सोयाबीन व कापसावर विविध कीडींचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांनी कीडकनाशकांचा सर्रास वापर सुरू केला आहे. मात्र यातील बहुतांश कीडकनाशकांची नावे शिफारस केलेल्या यादीत समाविष्ट नसल्याचे पुढे आले आहे.

'She' pesticide texture? | ‘ती’ कीटकनाशके बनावट?

‘ती’ कीटकनाशके बनावट?

Next
ठळक मुद्देपिकांचे होणार नुकसान : शिफ ारस नसलेल्या कीटकनाशकांचा वापर सुरूच

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर: सोयाबीन व कापसावर विविध कीडींचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांनी कीडकनाशकांचा सर्रास वापर सुरू केला आहे. मात्र यातील बहुतांश कीडकनाशकांची नावे शिफारस केलेल्या यादीत समाविष्ट नसल्याचे पुढे आले आहे. याशिवाय कीडकनाशकांच्या मिश्रणांचीही विक्री सुरू असताना अद्याप तक्रारी का केल्या जात नाही, असा प्रश्न विचारला जात आहे.
मागील वर्षी खरीप हंगामात कीटकनाशकांची हाताळणी करताना शेतकरी व शेतमजुरांना विषबाधा झाल्याच्या घटना घडल्या होत्या. जिल्ह्यातही वरोरा, कोरपना, राजुरा, जिवती, गोंडपिपरी व भद्रावती तालुक्यात विषबाधा झाली होती. त्यामुळे कीडनाशकांची फवारणी करताना जीवितहाणी होऊ नये, यासाठी कृषी विभागाने जनजागृती मोहीम सुरू केली. यावर्षी मात्र याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. बदलत्या हवामानामुळे यंदा कापूस व सोयाबिनवर विविध कीडींनी हल्ला केला. धानपिकावर लष्कर अळी तर कापसावर बोंड अळीने आक्रमण केल्याचे दिसून येते. यामुळे शेकडो शेतकरी कृषी केंद्रांमधून विविध प्रकारची किडकनाशके खरेदी करीत आहेत.
विकत घेतलेल्या कीटकनाशकांची तिव्रता आणि कीड रोगांना प्रतिबंधक करण्याची क्षमता किती, यासंदर्भात कीडकनाशक कायद्यानुसार शिफारशी करण्यात आल्या आहेत. कापसाकरिता यंदा १०४ तसेच सोयाबिनसाठी १८ कीटकनाशकांची शिफारस करण्यात आली आहे. परंतु शासनाच्या यादीत नसलेल्या सुमारे ६० कीटकनाशकांची विक्री होत, अशी माहिती शेतकºयांनी दिली. कोरपना, राजुरा, भद्रावती व वरोरा तालुक्यात हा प्रकार मोठ्या प्रमाणात सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. सरकारने या हंगामात जिल्हानियहाय पीक पद्धतीनुसार नोंदणीकृत व शिफारस केलेल्या कीटकनाशकांच्या विक्रीवर नियंत्रण आणण्याचे धोरण जाहीर केले. या धोरणानुसारच कीटकनाशकांची यादी राज्याच्या कृषी आयुक्तांनी जिल्हा प्रशासनाकडे पाठविली. पण, यादीबाहेरील कीटकनाशके कृषी केंद्रमध्ये आलीच कशी, असा प्रश्न जागृत शेतकरी विचारत आहेत.
६० कीटकनाशकांची चौकशी करा
जिल्हानिहाय पीक पद्धतीनुसार सोयाबिनकरिता १८ व कापसाकरिता १०४ कीटकनाशकांची यादी यंदाच्या खरीप प्रकाशित करण्यात आली आहे. या कीटकनाशकांची विक्री व वापर करण्यासाठी शेतकºयांना प्रोत्साहन देत असल्याचा दावा कृषी विभागाने केला. परंतु या यादीव्यतिरिक्त सुमारे ६० कीटकनाशकांची विक्री सुरु आहे. यासंदर्भात अद्याप तक्रारी झाल्या नाहीत. परंतु ‘लोकमत‘ च्या पाहणीनुसार काही कृषी केंद्रांमध्ये ही कीटकनाशके उपलब्ध आहेत. त्यामुळे संबंंिधत विभागाने चौकशी करण्याची माणगी शेतकऱ्यांनी केली आहे.
कीटकनाशकांचे कायदे कागदावरच
केंद्रीय कीटकनाशक मंडळ व नोंदणी समिती फरिदाबाद यांनी शिफारस केलेल्या कीटकनाशकांचा वापर करणे कीटकनाशक कायदा १९६८ तसेच कीटकनाशके नियम १९७१ तरतुदीनुसार बंधनकारक आहे. फरिदाबद येथील केंद्रीय कीटकनाशक मंडळ देशातील सर्वोच्च शासकीय संस्था आहे. या मंडळात नोंदणी केलेल्या कीटकनाशकांनाच उपत्पादन, साठवणूक, प्रदर्शन व विक्रीसाठी परवानगी दिली जाते.

Web Title: 'She' pesticide texture?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.