शिवणी बनले अस्वच्छतेचे माहेर घर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2017 12:33 AM2017-09-10T00:33:35+5:302017-09-10T00:33:50+5:30

सिंदेवाही पंचायत समिती अंतर्गत मौजा शिवणी येथील गावात भाऊराव देवगिरीकर, किसन घरत, संतोष मडावी यांच्या घरासमोर शेणखताचे ढिगारे साचलेले असून शेणखत ढिगारे हटविले नाही.

Shishi became the home of indigestion home | शिवणी बनले अस्वच्छतेचे माहेर घर

शिवणी बनले अस्वच्छतेचे माहेर घर

googlenewsNext
ठळक मुद्देग्रामपंचायतीचे दुर्लक्ष : नागरिकांचे आरोग्य धोक्यात

लोकमत न्यूज नेटवर्क
वासेरा : सिंदेवाही पंचायत समिती अंतर्गत मौजा शिवणी येथील गावात भाऊराव देवगिरीकर, किसन घरत, संतोष मडावी यांच्या घरासमोर शेणखताचे ढिगारे साचलेले असून शेणखत ढिगारे हटविले नाही. त्यामुळे घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. याचा परिणाम घराघरात तापाची साथ असून मजूरवर्गाला त्रास सहन करावा लागत आहे. शिवणी हे अस्वच्छतेचे माहेर घर बनले असून ग्रामपंचायत अस्वच्छतेकडे दुर्लक्ष करीत आहे, असा आरोप गावकºयांकडून होत आहे.
शिवणी हे चार हजार लोकसंख्येचे गाव असून गावाशेजारीच शेणखताचे ढिगारे साचलेले आहेत. शासन स्वच्छतेवर भर देवून जनतेचे आरोग्य सुधारण्याचा प्रयत्न करीत आहे. गावातील रस्त्याच्या कडेला अस्वच्छता दिसायला नको, यासाठी शासनस्तरावर मार्गदर्शन केले जातात. मात्र सिंदेवाही तालुक्यातील शिवणी गाव अपवाद आहे. गावात अस्वच्छता दिसत असून जागोजागी शेणाचे ढिग दिसत असून आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे.
शिवणी येथील भाऊराव देवगिरीकर, किसन घरत, संतोष मडावी, संजय उईके, प्रवीण वलके यांच्या घरासमोर गावातील काही लोकांनी शेणाचे ढिग ठेवलेले असून ते हटवण्यास ग्रामपंचायत टाळाटाळ करीत आहे. ग्रामपंचायत ढिगारे हटवण्यासंबंधात वारंवार तक्रार करूनही त्याकडे चालढकल करीत आहे. त्यातच भाऊराव देवगिरीकर यांच्या घरी त्यांची पत्नी वारंवार तापाणे त्रस्त असते. मोलमजूरी करून उदरनिर्वाह करणाºयाला ग्रामपंचायत दुर्लक्षामुळे उपासमारीचे जीवन जगावे लागत आहे.
यापूर्वी गावातीलच एकाला ट्रिपोसोमोनिया या रोगाने ग्रासले होते. तेव्हा गाव प्रकाशझोतात आले होते. गावातील अस्वच्छता कारणीभूत ठरवून शासनाने येथील दाऊलवार यांच्यावर लाखो रुपये खर्च करून त्याचा रोग बरा केला. पुन्हा गावात अस्वच्छता पसरली असून घरासमोर शेणखत ढिगारे वाढलेले आहे.

मी शिवणी येथे वास्तव्यास असून माझ्या घरासमोर गावातील एकाने शेणाचे ढिगारे साठवलेले आहे. वारंवार ग्रामपंचायत तक्रार करून ग्रा.पं. दुर्लक्ष करीत आहे. वारंवार घरी कुणालाही ताप येत असतो.मजुरी करणारे असल्याने आमच्यावर उपासमारीची पाळी येत आहे.
- भाऊराव देवगिरीकर
त्रस्त नागरिक, शिवणी

Web Title: Shishi became the home of indigestion home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.