शिवजयंती रयतेचे राज्य निर्माण करण्याचा संकल्प दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:35 AM2021-02-25T04:35:09+5:302021-02-25T04:35:09+5:30

बल्लारपूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी कायम रयतेच्‍या कल्‍याणाचा विचार केला. रयतेच्‍या हृदयातील सिंहासनाला त्‍यांनी कायम महत्त्व दिले. छत्रपतींचे नाव ...

Shiv Jayanti Day to resolve to create a state of ryots | शिवजयंती रयतेचे राज्य निर्माण करण्याचा संकल्प दिन

शिवजयंती रयतेचे राज्य निर्माण करण्याचा संकल्प दिन

googlenewsNext

बल्लारपूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी कायम रयतेच्‍या कल्‍याणाचा विचार केला. रयतेच्‍या हृदयातील सिंहासनाला त्‍यांनी कायम महत्त्व दिले. छत्रपतींचे नाव उच्‍चारताच आपल्‍या शरीरात एक उत्‍साह संचारतो, आपल्‍याला मोठी ऊर्जा मिळते. शिवजयंती हा केवळ छत्रपती शिवाजी महाराजांचे स्‍मरण करण्‍याचा, त्‍यांना आदरांजली वाहण्‍याचा दिवस नसून त्‍यांच्‍या संकल्‍पनेतील रयतेचे राज्‍य निर्माण करण्‍याचा संकल्‍प करण्‍याचा दिवस असल्‍याचे प्रतिपादन विधिमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

भारतीय जनता युवा मोर्चातर्फे बल्‍लारपूर येथे शिवजयंतीनिमित्त कार्यक्रम पार पडला. यावेळी ते बोलत होते. यावेळी भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष देवराव भोंगळे, माजी जिल्‍हाध्‍यक्ष बल्‍लारपूरचे नगराध्‍यक्ष हरीश शर्मा, अजय दुबे, राजू दारी, राजू गुंडेटी आदी उपस्थित होते.

यावेळी शहरातून मिरवणूक काढण्‍यात आली. आ. मुनगंटीवार यांच्‍या हस्‍ते शिवरायांच्‍या प्रतिमेचे पूजन करण्‍यात आले. शिवरायाच्‍या गौरवार्थ पोवाडा व सांस्‍कृतिक नृत्‍य असे कार्यक्रम पार पडले. छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या जीवनावर आधारित सामान्‍य ज्ञान व निबंध स्‍पर्धेत शहरातील ३३ शाळा आणि महाविद्यालयांतील सात हजार विद्यार्थ्‍यांनी सहभाग घेतला. यातील विजेते डॉली निषाद, श्रेय बडकेलवार, रुतुजा कुडे, टीना परसुटकर, मोहिनी साळवे, साहील केशकर यांना आ. मुनगंटीवार यांच्‍या हस्‍ते पारितोषिके वितरित करण्‍यात आली. सूत्रसंचालन भाजयुमो जिल्‍हाध्‍यक्ष आशिष देवतळे व धर्मप्रकश दुबे यांनी केले. कार्यक्रमासाठी काशी सिंह, शिवचंद द्विग्वेदी, नीलेश खरबडे, कांता ढोके, रेणुका दुधे, वैशाली जोशी, सारिका कनकम, जयश्री मोहुर्ले, स्‍वामी रायबरम, अरुण वाघमारे, महेंद्र ढोके, सुवर्णा भटारकर, रणंजय सिंह, मनीष पांडे, बुचय्या कंदीवार, पूनम मोडक, मिथिलेश पांडे, आदित्‍य शिंगाडे व अन्य कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.

Web Title: Shiv Jayanti Day to resolve to create a state of ryots

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.