भारनियमनाविरोधात शिवसेना रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2017 11:12 PM2017-10-09T23:12:29+5:302017-10-09T23:12:56+5:30
सध्या राज्यभरात सात ते आठ तासांचे भारनियमन सुरू असून यामुळे नागरिकांसह शेतकरी त्रस्त झाले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : सध्या राज्यभरात सात ते आठ तासांचे भारनियमन सुरू असून यामुळे नागरिकांसह शेतकरी त्रस्त झाले आहेत. या भारनियमनाच्या विरोधात शिवसेनेच्या पदाधिकाºयांनी सोमवारी चंद्रपूर शहरातील वर्दळीच्या बसस्थानक मुख्य मार्गावर रास्ता रोको आंदोलन करून शासनाचा निषेध नोंदविला.
चंद्रपूर जिल्ह्यात विजेची निर्मिती मोठ्या प्रमाणात होते. मात्र जिल्ह्यालाच भारनियमनाला सामोरे जावे लागत असून हे मोठे दुदैव आहे. जिल्ह्यात मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी पावसाची सरासरी ३३ टक्के इतकाच पाऊस झाला. त्यामुळे शेत पिकांना पुरेशा प्रमाणात पाणी मिळाले नसल्याने मोठ्या प्रमाणात परिणाम जाणवत आहे. त्यामुळे कृषी पंपाद्वारे पिकांना पाणी देण्यासाठी शेतकºयांची धावपळ सुरू आहे. मात्र चंद्रपूर जिल्ह्यात तसेच राज्यात वीज वितरण कंपनीकडून भारनियमन सुरू आहे. त्यामुळे कृषी पंपाना पुरेशा प्रमाणात विजेचा पुरवठा होत नसल्याने शेतपिकांना पाणी देण्यास अडचणी येत आहेत. यामुळे शेतकरी हवालदिल असून सामान्य नागरिकही भारनियमनाने हैराण आहे. त्यामुळे विजेचे भारनियमन तत्काळ बंद करण्याची मागणी शिवसेनेने आंदोलनाच्या माध्यमातून केली आहे.
या मोर्चाचे नेतृत्व जिल्हाप्रमुख सतिश भिवगडे, संदिप गिºहे, चंद्रपूर विधानसभा प्रमुख किशोर जोरगेवार, महिला आघाडी प्रमुख विजया शेंडे, शहरप्रमुख सुरेश पचारे, वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष सोहेल शेख आदींनी केले. या आंदोलनाला आ. बाळू धानोरकर अनिल धानोरकर यांनी भेट दिली. यावेळी राहुल विरूरकर, प्रणय धोबे, सुरज धोगे, हर्षल कामनपल्लीवार, मोहीत व इतर शिवसैनिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.