सीएमडी कार्यालयावर शिवसेनेची धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2017 12:33 AM2017-11-08T00:33:31+5:302017-11-08T00:33:42+5:30

वेकोलिकडून कोणत्याही प्रकारची पूर्व सूचना न देता खाजगी कंपन्यांचे ठेके रद्द करण्यात आले. अनेक वर्षांपासून सुरक्षा रक्षक वेकोलिमध्ये कार्यरत होते.

Shivsena's strike at CMD office | सीएमडी कार्यालयावर शिवसेनेची धडक

सीएमडी कार्यालयावर शिवसेनेची धडक

Next
ठळक मुद्देकिशोर जोरगेवार यांची मागणी : वेकोलिने सुरक्षा रक्षकांना कामावर घ्यावे

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : वेकोलिकडून कोणत्याही प्रकारची पूर्व सूचना न देता खाजगी कंपन्यांचे ठेके रद्द करण्यात आले. अनेक वर्षांपासून सुरक्षा रक्षक वेकोलिमध्ये कार्यरत होते. पण खाजगी कंपन्यांचे ठेके रद्द झाल्यामुळे त्यांना वेकोलि प्रशासनाकडून कामावरून कमी करण्यात आले. या कामगारांना त्वरीत कामावर घ्या, या मागणीसाठी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात नागपूर येथील वेकोलिच्या सीएमडी कार्यालयावर मंगळवारी धडक मोर्चा काढण्यात आला.
सुरक्षा रक्षकांना कामावरून कमी केल्याने वेकोलिची राष्ट्रीय संपत्ती उघड्यावर पडली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात चोºयांचे प्रमाण वाढले. या मागण्यांना घेऊन जोरगेवार यांच्या नेतृत्वात वारंवार आंदोलन करण्यात आले. मात्र वेकोलि प्रशासनाकडून दखल घेण्यात आली नाही.
काही दिवसानंतर वेकोलिने खाजगी सुरक्षा रक्षकांना पुर्ववत कामावर घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र वेकोलिने चंद्रपूर, बल्लारपूर व वणी एरियातील खाणीत काम करणाºया सुरक्षा रक्षकांबाबतची भूमिका स्पष्ट केली नाही. त्यामुळे सुरक्षा रक्षकांना टप्या-टप्याने कामावर न घेता या सर्वांना एकाच वेळेस कामावर घेण्यात यावे, या मागणीसाठी मंगळवारी सीएमडी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.
कामगारांच्या मागण्यांसाठी किशोर जोरगेवार यांनी लढा उभारून १६ सप्टेंबरला चंद्रपुरात, २५ सप्टेंबरला उर्जाग्राम येथील मुख्य प्रबंधक वणी एरिया कार्यालयासमोर धरणे आंदोलन, त्यानंतर १३ आॅक्टोबरला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
गेल्या अनेक वर्षांपासून काम करत असलेल्या सुरक्षा रक्षकांवरील अन्याय खपून घेणार नाही, असा इशारा देत वेकोलिने सर्व खाणीत काम करणाºया खाजगी सुरक्षा रक्षकांना एकाच वेळी रूजू करावे, अशी मागणी जोरगेवार यांनी दरम्यान केली. यावेळी सी.एम.डी. यांना निवेदन देत मागण्यांची पुर्तता न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा जोरगेवार यांनी दिला आहे.

Web Title: Shivsena's strike at CMD office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.