शिवशाही बसेस सुसाट !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 05:00 AM2021-09-08T05:00:00+5:302021-09-08T05:00:34+5:30
मागील वर्षी कोरोनाने महामंडळाच्या बसफेऱ्या पहिल्यांदाच बंद करण्यात आल्या. त्यानंतर रुग्णसंख्या कमी होत असताना टप्प्या-टप्प्याने बसफेऱ्या सुरू करण्यात आल्या. सुरुवातीला प्रवाशांची संख्या कमी होती. मात्र आता पूर्ण क्षमतेने बसफेऱ्या धावत आहेत. त्याला प्रवाशांकडूनही उत्तम प्रतिसाद मिळत आहे. सुरुवातीला साध्या बसेसच प्रवाशांच्या सेवेत सोडण्यात आल्या होत्या. मात्र जसजशी प्रवाशांची संख्या वाढत गेली. तशाच शिवशाही बसही सुरू करण्यात आल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. त्यामुळे महामंडळाच्या बसफेऱ्या पूर्ण क्षमतेने धावत आहेत. प्रवाशांचाही उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील चारही डेपोतील पाचही शिवशाही बस धावत आहेत. त्यालासुद्धा प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे महामंडळाची रुळावरून घसरलेली गाडी लवकरच रुळावर येण्याची शक्यता आहे. मागील वर्षी कोरोनाने महामंडळाच्या बसफेऱ्या पहिल्यांदाच बंद करण्यात आल्या. त्यानंतर रुग्णसंख्या कमी होत असताना टप्प्या-टप्प्याने बसफेऱ्या सुरू करण्यात आल्या. सुरुवातीला प्रवाशांची संख्या कमी होती. मात्र आता पूर्ण क्षमतेने बसफेऱ्या धावत आहेत. त्याला प्रवाशांकडूनही उत्तम प्रतिसाद मिळत आहे. सुरुवातीला साध्या बसेसच प्रवाशांच्या सेवेत सोडण्यात आल्या होत्या. मात्र जसजशी प्रवाशांची संख्या वाढत गेली. तशाच शिवशाही बसही सुरू करण्यात आल्या. जिल्ह्यातील चारही आगारात पाच शिवशाही बस सुरू करण्यात आल्या आहेत.
या मार्गावर सुरू आहेत शिवशाही
चंद्रपूर जिल्ह्यातील चार डेपोमध्ये एकूण पाच शिवशाही बस आहेत. त्यापैकी चार बस या चंद्रपूर ते नागपूर मार्गावर धावतात. तर एक शिवशाही चंद्रपूर ते राजुरा मार्गावर धावते. प्रवाशांचा प्रतिसाद लाभत आहे.
बसेसचे दररोज सॅनिटायझेशन
जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाली असली तरी तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात आली आहे. एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कोरोनाची लागण होऊ नये, याची काळजी घेतली जात आहे. त्यासाठी प्रत्येक बसेस स्वच्छ धुऊन त्यांचे सॅनिटायझेशन केले जात आहे. तसेच प्रवाशांना गर्दी न करण्याबाबत व तोडाला मास्क लावण्याबाबतच्या सूचना महामंडळाकडून देण्यात येत आहेत.
सर्वच मार्गावर प्रतिसाद
रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे ९० टक्क्यांच्या वर बसफेऱ्या सुरू झाल्या आहेत. त्याला प्रवाशांचासुद्धा प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यातील चार आगारांतून पाच शिवशाही बस धावत आहेत. बसफेरी सोडण्यापूर्वी बसचे सॅनिटायझेशन करण्यात येते. शिवशाहीला काही प्रमाणात प्रवासी प्रतिसाद देत आहेत.
- स्मिता सुतावणे, विभागीय वाहतूक नियंत्रक, चंद्रपूर