महावीर जयंतीनिमित्त चंद्रपुरात शोभायात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 12:31 AM2018-03-30T00:31:40+5:302018-03-30T00:31:40+5:30
महावीर जयंतीचे औचित्य साधून सकल जैन समाजाच्या वतीने गुरुवारी रथावर आरुढ भगवान महावीर यांची शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी चंद्रपुरातील जैन समाजबांधव सहभागी झाले होते.
ऑनलाईन लोकमत
चंद्रपूर : महावीर जयंतीचे औचित्य साधून सकल जैन समाजाच्या वतीने गुरुवारी रथावर आरुढ भगवान महावीर यांची शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी चंद्रपुरातील जैन समाजबांधव सहभागी झाले होते.
स्थानिक जैन भवनातून सकाळी ७ वाजता ही शोभायात्रा काढण्यात आली. शहराच्या मुख्य मार्गाने ही शोभायात्रा निघाली. ठिकठिकाणी शोभायात्रेचे स्वागत करण्यात येत होते. यासोबतच मार्गावर ठिकठिकाणी शितपेयाचीही व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी जैन स्थानकवासी श्रावक संघाचे अध्यक्ष योगेश भंडारी, मूर्ती पूजक संघाचे सचिव राजेश डागा, दिगंबर जैन मंदिराचे अध्यक्ष सुभाष जैन, दादावाडीचे अध्यक्ष राज पुगलिया यांनी मार्गदर्शन केले. पाण्याच्या टाकीजवळ महावीर इंटरनॅशनल संस्थेच्या वतीने थंड पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. आझाद बागेजवळ आनंद नागरी सहकारी बँकेच्या वतीने सरबतचे वितरण करण्यात आले. जिनदल सुरी मंडळाकडून शितपेय, जैन मित्र मंडळाकडून फळाचे वितरण करण्यात आले. यासोबत जिल्हा सामान्य रुग्णालयातील नवजात बाळांना महावीर इंटरनॅशनलच्या वतीने बेबी कीट वाटप करण्यात आले. शोभायात्रेत जितेंद्र चोरडिया, राहुल पुगलिया, फेनबाबू भंडारी, संदीप बांठिया, दीपक डगली, रोहित पुगलिया, राजेश चोरडिया, जितेंद्र मेहेर, विशाल मुथा, डॉ. महावीर सोईतकर, अजय संघवी, योगेश पुगलिया, नरेश सुराणा, सुधा सिंघवी, सरिता चोरडिया, राजश्री मुथा, नेहा बैर, कविता डागा, भारती बांठिया, सरिता मेहेर, रश्मी भंडारी, कमलाबाई चोरडिया आदी सहभागी झाले होते.