१६ हजार १७३ वीज ग्राहकांना ‘शाॅक’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:31 AM2021-09-22T04:31:10+5:302021-09-22T04:31:10+5:30
चंद्रपूर : महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळातील घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक, सरकारी कार्यालये अशा ३ लाख ६३ हजार ७८४ ग्राहकांकडेे मार्च ...
चंद्रपूर : महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळातील घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक, सरकारी कार्यालये अशा ३ लाख ६३ हजार ७८४ ग्राहकांकडेे मार्च ते सप्टेंबर २०२१ पर्यंतची मागील वर्षातील १६ कोटी ७८ लाख रुपये तसेच चालू वर्षातील ५५ कोटी १४ लाख अशी थकबाकी ७१ कोटी ९२ लाखांवर पोहचली आहे. त्यामुळे वसुलीसाठी महावितरणने सक्त पाऊल उचलणे सुरु केले आहे. दरम्यान, थकीत असलेल्या १६ हजार १७३ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. यामध्ये १० हजार ९४२ थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा तात्पुरता तर ५ हजार २३१ ग्राहकांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित करण्यात आला आहे.
महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळात चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्हयातील घरगुती ग्राहकांकडून मार्च २०२१ ते सप्टेंबर २०२१ या कालावधीत ४८ कोटी ९७ लाख येणे आहे. वाणिज्यिक गाहकांकडून ९ कोटी ५८ लाख, औदयोगिक ७ कोटी ७१ लाख, सरकारी कार्यालये व इतर लघुदाब ग्राहकांकडून ५ कोटी ६६ लाख येणे आहे.
बाॅक्स
या कायद्यानुसार कारवाई
वीजपुरवठा खंडित करण्यात आलेल्या ग्राहकांकडून अनधिकृत वीज वापर आढल्यास वीज कायदा २००३ च्या कलम १३५ व कलम १३८ अंतर्गत कारवाई करण्यात येत आहे. थकबाकीदारांना वीज बिल भरणे सोईचे व्हावे यासाठी सुटीच्या दिवशीही वीज बिल भरणा केंद्र सुरू ठेवण्यात येणार आहे.
कोट
ग्राहकांनी वेळेत वीज बिल भरून होणारी कारवाई टाळावी. बिल भरण्यासाठी सुटीच्या दिवशीही कार्यालये सुरु ठेवण्यात येणार आहे. ग्राहकांनी बिल भरून महावितरणला सहकार्य करावे.
-सुनील देशपांडे
मुख्य अभियंता, चंद्रपूर परिमंडळ