वीज वितरणचा घरगुती ग्राहकांना शॉक

By admin | Published: May 10, 2017 12:52 AM2017-05-10T00:52:31+5:302017-05-10T00:52:31+5:30

विद्युत नियामक आयोगाच्या निर्देशानुसार वीज वितरण कंपनीने एप्रिल महिन्यापासून घरगुती वीज ग्राहकांच्या दरात मोठी वाढ केली.

Shock to domestic customers of power distribution | वीज वितरणचा घरगुती ग्राहकांना शॉक

वीज वितरणचा घरगुती ग्राहकांना शॉक

Next

वीज बिल वाढीमुळे नागरिक त्रस्त : वीज देयकात आर्थिक लुटमार
अनेकश्वर मेश्राम। लोकमत न्यूज नेटवर्क
बल्लारपूर : विद्युत नियामक आयोगाच्या निर्देशानुसार वीज वितरण कंपनीने एप्रिल महिन्यापासून घरगुती वीज ग्राहकांच्या दरात मोठी वाढ केली. परिणामी वीज बिल वाढीमुळे सामान्य ग्राहक त्रस्त झाला असून वीज देयकाच्या माध्यमातून आर्थिक लुटमार करीत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
ज्या घरगुती ग्राहकाने १०० युनिटच्या वर वीज वापर केला, अशा ग्राहकांना एका युनिटचा दर ७ रुपये ५० पैसे पडत आहे. वीज वितरण कंपनीने घरगुती ग्राहकांना दरवाढीचा जबरदस्त शॉक दिल्याने नागरिकात असंतोष निर्माण झाला आहे.
सर्वसामान्य जनतेला विजेची नितांत गरज आहे. घरासाठी तर मुलभूत गरज म्हणून विजेचा वापर आवश्यक झाला आहे. याचा फायदा घेत विद्युत नियामक आयोगाने मोठमोठ्या उद्योगपतींना वीज दरात सवलत देत आहे. मात्र सामान्य ग्राहकांच्या माथी वीज दरवाढीचा जोरदार फटका मारला आहे. वीज वितरण कंपनी वापरलेल्या युनिटचा वीज आकारासह स्थिर आकार, वहन आकार, १६ टक्केवीज शुल्क वीज बिलात आकारुन दर महिन्याला वीज देयकाच्या माध्यमातून आर्थिक लुटमार सुरु असल्याचा आरोप ग्राहकांनी केला आहे.
वीज वितरण कंपनीने घरगुती वीज ग्राहकांसाठी १०० युनिटपर्यंत तीन रुपये, १०० ते ३०० युनिटपर्यंत सात रुपये, ३०० ते ५०० युनिटपर्यंत १० रुपये व ५०० ते एक हजार युनिटपर्यंत ११ रुपये असे दर ठरविले आहेत. यामध्ये स्थिर, वीज आकारुन वहन आकार व वीज शुल्क जोडले जात असून वीज देयकात वाढीव रक्कम जोडण्याचे कारस्थान सुरू आहे. परिणामी सामान्य वीज ग्राहकांना दीड ते दोन पट वीज दरवाढीचा भार सोसावा लागत आहे. ही दरवाढीची बाब मे महिन्याच्या वीज देयकात नमुद केल्यामुळे घरगुती वीज ग्राहकांना जबरदस्त शॉक बसला आहे. सदर बाब सामान्य ग्राहकांवर लादण्यात आल्यामुळे असंतोष वाढीला लागला आहे.राज्यात व जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विजेचे उत्पादन घेतले जाते. येथील वीज कमी दरात बाहेरील राज्याला पुरवठा केला जातो. औद्योगिक आस्थापनाला सवलतीच्या दरात वीज पुरविली जाते. उद्योगपतीच्या वीज सवलतीचा भार सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशातून वसूल करण्याचे पाप वीज वितरण कंपनीने सुरु केले आहे. घरगुती वीज वापर करणाऱ्या ग्राहकांवर आर्थिक भुर्दंड सहन करण्याची पाळी कंपनीने आणली आहे. वीज नियामक आयोगाने सूचविलेली वीज दर वाढ वीज वितरण कंपनीने कमी करावी, दर महिन्याच्या वीज बिलात जोडलेले इतर आकार व वीज शुल्क कपात करुन केवळ वीज आकाराचे देयक घरगुती ग्राहकांना देण्यात यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Web Title: Shock to domestic customers of power distribution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.