राजुरा विधानसभेचा धक्कादायक निकाल

By admin | Published: October 19, 2014 11:52 PM2014-10-19T23:52:13+5:302014-10-19T23:52:13+5:30

राजुरा विधानसभा क्षेत्रातील निकाल धक्कादायक लागला. काँग्रेसचे उमेदवार सुभाष धोटे यांचा २ हजार २७८ मतांनी पराभव करुन भाजपाचे अ‍ॅड. संजय धोटे विजयी झाले.

The shocking result of the Rajura assembly | राजुरा विधानसभेचा धक्कादायक निकाल

राजुरा विधानसभेचा धक्कादायक निकाल

Next

राजुरा : राजुरा विधानसभा क्षेत्रातील निकाल धक्कादायक लागला. काँग्रेसचे उमेदवार सुभाष धोटे यांचा २ हजार २७८ मतांनी पराभव करुन भाजपाचे अ‍ॅड. संजय धोटे विजयी झाले.
सुभाष धोटे यांना ६३ हजार ८४५ मते मिळाली तर भाजपाचे अ‍ॅड. संजय धोटे यांना ६६ हजार २२३ मते मिळाली.
सुधाकर किनाके १ हजार ६०१, उद्धव नारनवरे १ हजार २५१, प्रवीण निमगडे ५०५, शोभा मस्की ६७०, अरुण वासलवार १ हजार २१४, विद्यासागर कासर्लावार ७९८, सटवा थोरात ८३७, प्रेमदास मेश्राम एक हजार ११३, मदन बोरकर १ हजार ५६७ मते घेतली, १ हजार ३२४ मतदारांना १६ पैकी एकही उमेदवार पसंत आला नाही.
संजय धोटेंची रॅली
भारतीय जनता पक्षाच्या विजयानंतर राजुरा शहरात भव्य विजयी रॅली काढण्यात आली, शिवाजी महाविद्यालय स्टेडियमपासून निघालेली रॅली राजुरा शहरातील मुख्य रस्त्याने नाचत गाजत काढण्यात आली. या विजयी रॅलीमध्ये वाहनावर भाजपाचे नवनिर्वाचित आ. संजय धोटे यांच्या सोबत भाजपाचे राजुरा विधानसभा प्रमुख खुशाल बोंडे, भाजपा अरुण मस्की, बादल बेले, राजुरा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रशांत गुंडावार, सिद्धार्थ पथाडे, विनायक देशमुख, सतिश धोटे, मंगेश श्रीराम, मधुकर नरड, सोमेश्वर आईटलावार यासह राजुरा, कोरपना, जिवती, गोंडपिपरी तालुक्यातील हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.
गांधी चौक येथे झालेल्या विजयी सभेत नवनिर्वाचीत आ. अ‍ॅड. संजय धोटे म्हणाले, राजुरा विधानसभा क्षेत्रातील नागरिकांनी माझ्यावर, भाजपा पक्षावर विश्वास ठेऊन मला निवडणूक दिले. मी या क्षेत्रातील नागरिकांना हक्क मिळवून देण्यासाठी नेहमी प्रयत्न करीन.
मतदारांचे आभार- सुभाष धोटे
राजुरा विधानसभा क्षेत्रातील नागरिकांनी मला भरपूर मतदान केले. थोड्या फरकाने पराजय झाला असला तरी मी या मतदान क्षेत्राच्या समस्या नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी नेहमी तत्पर राहील.
सक्रिय राहणार- सुदर्शन निमकर
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी या क्षेत्रातील मतदारानी सहकार्य केले त्यासह सर्व नागरीकाच्या समस्या सोडविण्यासाठी मी तत्पर राहून कार्य करणार आहे.

Web Title: The shocking result of the Rajura assembly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.