धक्कादायक! नदीच्या प्रवाहात तीन मुले वाहून गेली, तोहोगाव येथील खळबळजनक घटना
By राजेश भोजेकर | Published: July 8, 2023 07:10 PM2023-07-08T19:10:05+5:302023-07-08T19:10:13+5:30
गोंडपिपरी तालुक्यातील तोहोगाव येथील वर्धा नदीत पोहायला गेलेली ३ शाळकरी मूले पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची खळबळजनक घटना शनिवारी दुपारी दोन वाजतादरम्यान घडली.
चंद्रपूर : गोंडपिपरी तालुक्यातील तोहोगाव येथील वर्धा नदीत पोहायला गेलेली ३ शाळकरी मूले पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची खळबळजनक घटना शनिवारी दुपारी दोन वाजतादरम्यान घडली.
तोहोगाववरून दोन किलोमीटर शिंदीजवळ असणाऱ्या वर्धा नदीत १० ते ११ वयोगटातील ४ मित्र पोहायला गेले होते. त्यापैकी ३ जण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची घटना घडली. नदी पात्रावर त्यांचे कपडे व पादत्राणे असल्याने हा अंदाज बांधल्या जात आहे.
वाहून गेल्यामध्ये प्रतिक नेताजी जुनघरे, निर्दोष ईश्वर रंगारी व सोनल सुरेश रायपुरे ही मुले असल्याची चर्चा असून आरुष प्रकाश चांदेकर हा मुलगा मात्र पाण्यात न उतरल्याने घरी सुखरूप परत आल्याचे बोलल्या जात आहे. गावातीलच एका महिलेने ३ मुलांना पाण्यात वाहून जाताना बघितल्याने युद्धस्तरावर शोध मोहीम सुरू असून घटनास्थळी लाठी व कोठारी पोलीस दाखल झाले आहे. अद्याप मुलांचा शोध लागला नाही.