आमदार पडळकरांच्या प्रतीकात्मक पुतळ्यावर जुते, चपलांचा प्रहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:34 AM2021-09-08T04:34:13+5:302021-09-08T04:34:13+5:30

राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री म्हणून राज्यात ...

Shoes and slippers hit the symbolic statue of MLA Padalkar | आमदार पडळकरांच्या प्रतीकात्मक पुतळ्यावर जुते, चपलांचा प्रहार

आमदार पडळकरांच्या प्रतीकात्मक पुतळ्यावर जुते, चपलांचा प्रहार

Next

राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री म्हणून राज्यात उल्लेखनीय काम केले आहे. त्यांचे काम विरोधकांच्या डोळ्यात खुपत आहे. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी कोणतेही पुरावे न देता खोटे आरोप करून बदनामी करण्याचे षडयंत्र रचले आहे. आमदार पडळकर यांच्याविरोधात राज्यातील बहुजन समाज आणि काँग्रेस प्रेमींमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. आमदार पडळकर यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी रितेश तिवारी यांनी यावेळी केली.

आमदार पडळकर यांनी वडेट्टीवार यांची जाहीर माफी मागावी, अशीही मागणी यावेळी करण्यात आली. त्यानंतर चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक सुधाकर अंभोरे यांच्याकडे आमदार पडळकर यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली.

यावेळी चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी, ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सुनीता अग्रवाल, नगरसेवक प्रशांत दानव, नगरसेवक नीलेश खोब्रागडे, माजी नगरसेवक प्रवीण पडवेकर, अनुसूचित जाती आघाडीच्या अध्यक्ष अनुताई दहेगावकर, शालिनी भगत, माजी नगरसेवक दुर्गेश कोडाम, उमाकांत धांडे, नरेंद्र बोबडे, सचिन कत्याल, राजेश अडडूर, कुणाल चहारे, मोहन डोंगरे पाटील, माजी नगरसेविका वंदना भागवत यांच्यासह सर्व फ्रंटल ऑर्गनायझेशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Shoes and slippers hit the symbolic statue of MLA Padalkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.