अल्प दराने धान्यांची खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2018 10:45 PM2018-11-02T22:45:21+5:302018-11-02T22:45:40+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : तालुक्यातील स्नेहा इंडस्ट्रीज महाकुर्ला या कंपनीला पणन महासंघ पुणेतर्फे शेतकऱ्यांचे धान्य खरेदी करण्याचा परवाना ...
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : तालुक्यातील स्नेहा इंडस्ट्रीज महाकुर्ला या कंपनीला पणन महासंघ पुणेतर्फे शेतकऱ्यांचे धान्य खरेदी करण्याचा परवाना दिला आहे. मात्र या इंडस्ट्रीजतर्फे अल्प दरात धान्याची खरेदी करुन शेतकऱ्यांची लूट करीत आहेत. त्यामुळे या कंपनीचा परवाना रद्द करावा, तसेच व्यवस्थापकावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रतिनिधी महेश मेंढे यांच्या नेतृत्वातील पथकाने जिल्हा उपनिबंधकाला दिलेल्या निवेदनातून केले आहे.
अनेक भागातील पीके निघाली आहेत. तर काही भागातील पीके निघण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे पणन महासंघातर्फे चंद्रपूर तालुक्यातील व जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा माल ३४५० रु. हमीभावाने खरेदी करण्याचा अधिकार स्नेहा इंडस्ट्रीजला दिला आहे. मात्र या कंपनीतर्फे शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात येत आहे. कंपनीतर्फे शेतकऱ्यांकडून हमी भावाने माल खरेदी करणे नियमबद्ध असताना हमी भावापेक्षा ६०० ते ७०० रु. कमी दराने मालाची खरेदी करण्यात येत आहे. पूर्वीच शेतकरी हा आर्थिक संकटात सापळला आहे. त्यातच हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी केल्याने शेतकऱ्यांमध्ये नैराश्य निर्माण होत आहे.
हमी भावापेक्षा कमी दराने शेतकऱ्यांचा माल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यावर गुन्हे दाखल करण्याचे शासनाचे निर्देश आहे.
मात्र स्नेहा फुड इंडस्ट्रीजतर्फे नियम पायदळ तुडविले जाते. त्यामुळे स्नेहा इंडस्ट्रीज कंपनीची चौकशी करुन परवाना रद्द करावा, व्यवस्थापकावर गुन्हा नोंद करुन शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी उपनिबंधक ज्ञानेश्वर खाडे यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. निवेदनाची पत्र पणनमंत्री चंद्रकांत पाटील यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.
निवेदन देणाºया शिष्टमंडळात ग्रामपंचायतचे माजी सरपंच रमेश बुचे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नागेश बोंडे, रोशन रामटेके, ग्राम पंचायत सदस्य अनिल नरूले, सचिन रणवीर, सौरभ बुरेवार, पवन आगदारी आदी उपस्थित होते.