मुलांच्या खेळातील नोटेने दुकानदारांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:54 AM2021-03-04T04:54:19+5:302021-03-04T04:54:19+5:30

असाच एक किस्सा भद्रावती शहरातील मेन रोडवरील एका दुकानात घडला. एका लहान मुलीने त्या दुकानातून शालेय साहित्य विकत घेतले ...

Shoplifters cheated with children's play notes | मुलांच्या खेळातील नोटेने दुकानदारांची फसवणूक

मुलांच्या खेळातील नोटेने दुकानदारांची फसवणूक

Next

असाच एक किस्सा भद्रावती शहरातील मेन रोडवरील एका दुकानात घडला. एका लहान मुलीने त्या दुकानातून शालेय साहित्य विकत घेतले व दुकानदाराला ५० रुपयांची खेळण्यातील नोट दिली. त्या दुकानदाराने ती नोट रंगाने खऱ्या नोटेसारखी असल्याने व आकारानेही जवळपास सारखीच असल्याने आपल्या गल्ल्यात ठेवून दिली. तीच नोट दुसऱ्या दिवशी एका ग्राहकाला दिली असता ती नोट मुलांच्या खेळण्यातील नकली नोट असल्याचे लक्षात आले. त्या ग्राहकाने त्या दुकानदाराला ती नोट परत केली व खरी नोट मागितली. त्या दुकानदाराने नोटेचे निरीक्षण केले असता त्या नोटेवर ‘चिल्ड्रन ‌बँक ऑफ इंडिया’ आणि ‘फूल ऑफ फन’ असे लिहिलेले आढळून आले. त्यामुळे दुकानदाराचे ५० रुपयांचे नुकसान झाले. सध्या ५० आणि १०० च्या अशा हुबेहूब खऱ्या नोटांसारख्या दिसणाऱ्या नकली नोटा बाजारात असून, त्या स्वीकारताना काळजीपूर्वक पाहणे आवश्यक आहे.

Web Title: Shoplifters cheated with children's play notes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.