राजुºयाचे हरहुन्नरी युवक करताहेत लघु चित्रपट निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2017 12:23 AM2017-11-08T00:23:23+5:302017-11-08T00:23:37+5:30

चित्रपट निर्मितीचे कोणतेही वातावरण नसताना राजुरासारख्या दुर्गम भागात लघु चित्रपट निर्मितीचे धाडस करणे, ही बाब अंत्यत भूषणावह आहे.

The short films produced by Raju's Harhunari youth are produced | राजुºयाचे हरहुन्नरी युवक करताहेत लघु चित्रपट निर्मिती

राजुºयाचे हरहुन्नरी युवक करताहेत लघु चित्रपट निर्मिती

googlenewsNext
ठळक मुद्देमान उंचावणार : चित्रपट निर्मितीचे एक पाऊल पुढे

लोकमत न्यूज नेटवर्क
गोवरी : चित्रपट निर्मितीचे कोणतेही वातावरण नसताना राजुरासारख्या दुर्गम भागात लघु चित्रपट निर्मितीचे धाडस करणे, ही बाब अंत्यत भूषणावह आहे. कलेचा ध्यास असलेल्या राजुरा शहरातील पाच-सहा हरहुन्नरी धडपड्या कलाकार युवकांनी अंधश्रद्धा निर्मूलनावर आधारित लघु चित्रपट निर्मिती करण्याचा प्रयत्न केला असून या लघु चित्रपटाचे चित्रीकरणही सुरु झाले आहे.
माणसाच्या अंगी कला असली की तो त्या कलेला आयुष्यभर जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करतो. समाजातील घालमेल कलेच्या माध्यमातून समाजसमोर मांडण्यासाठी कलावंत महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात. राजुरा येथील युवा कलावंत अविनाश दोरखंडे यांनी लघु चित्रपटाची संकल्पना आपल्या मित्रांंजवळ बोलून दाखविली आणि येथूनच सुरु झाली लघु चित्रपट निर्मितीची वाटचाल. समाजात वाढत असलेली अंधश्रद्धा व त्याच समाजातील भावी पिढीवर होणारे दूरगामी परिणाम चिंतेची बाब असून ते लघु चित्रपटातून दाखविले जावे, असा मानस असून ‘शु.. कोई है’ असे या लघु चित्रपटाचे नाव आहे.
या लघु चित्रपटातून अंधश्रद्धेमुळे वाहवत जाणारी तरुण पिढी व त्याचे जनजीवनावर होणारे वाईट परिणाम समाजाचा घात करणारे आहेत, त्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन आज काळाची गरज असल्याचे या लघु चित्रपटातून दाखविण्यात येणार आहे. चित्रपट निर्मितीचे कोणतेही वातावरण नसलेल्या राजुºयात लघु चित्रपटाची निर्मिती होणे ही बाब शहराचे नाव उंचावरी आहे. या चित्रपटात कलावंत अविनाश दोरखंडे, गणेश दाते, मोहन तलेगुरवार, राहुल थोरात, तमन्ना शेख, अपर्णा येरकल्ला तर बालकलाकार राधा दोरखंडे, आर्यन दोरखंडे, सोनु रहिकवार आहे.
या चित्रपटाचे लेखन, निर्माण, दिग्दर्शन गणेश रहिकवार यांनी केले आहे. सर्वच कलाकारांच्या भूमिका दमदार आहेत. विशेष म्हणजे या लघु चित्रपटातील सर्व युवा कलाकार, राजुºयातील श्री शिवाजी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. त्यामुळे या महाविद्यालयातून कलावंत घडत असल्याचे समाधान असून हा चित्रपट नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल, अशी आशा आहे.

Web Title: The short films produced by Raju's Harhunari youth are produced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.