नागभीडच्या कोविड सेंटरवर औषधांचा तुटवडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:28 AM2021-04-21T04:28:29+5:302021-04-21T04:28:29+5:30
कोविड सेंटरची स्थितीही पुरेशी चांगली नाही. तालुक्यात कोरोनाने चांगलाच थैमान घातला आहे. येथे रोज २०० च्या आसपास व्यक्ती कोरोना ...
कोविड सेंटरची स्थितीही पुरेशी चांगली नाही.
तालुक्यात कोरोनाने चांगलाच थैमान घातला आहे. येथे रोज २०० च्या आसपास व्यक्ती कोरोना तपासणी करून घेत असून त्यातील ३० ते ३५ व्यक्ती पॉझिटिव्ह येत आहेत. यातील काही रूग्णांचे गृह अलगीकरण करण्यात येत असून काही रूग्णांना कोविड सेंटरमध्येच दाखल करून घेण्यात येत आहे.
पॉझिटिव्ह आलेल्या रूग्णांना औषध, गोळ्या व काही रूग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता असली तरी पाहिजे त्या प्रमाणात येथे औषध, गोळ्या व ऑक्सिजनचा पुरवठा होत नसल्याची माहिती आहे. परिणामी अनेक रूग्णांना खासगी प्रतिष्ठाणांमधून महागडी औषध खरेदी करावी लागत आहे. या कोरोना सेंटरवर ऑक्सिजनचे १६ हंडे असले तरी ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा होत नसल्याने ऑक्सिजनसाठी रोजच गाडी पाठवावी लागते, अशीही माहिती आहे. या कोविड सेंटरवरील रूग्णसंख्या बघता कमीतकमी ८ ते १० अधिपरिचारिकांची गरज आहे. मात्र या कोविड सेंटरचा भार केवळ एक डॉक्टर व चार अधिपरिचारिका सांभाळत असल्याची माहिती आहे. ज्या हॉलमध्ये रूग्णांची व्यवस्था करण्यात आली आहे, त्या हॉलमधील बेडची अवस्था अतिशय दयनिय झाली आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्याने कुलरची व्यवस्था करण्याची मागणी होत आहे.