आठवडाभरात लसीकरणाचा तुटवडा कमी होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:27 AM2021-05-16T04:27:32+5:302021-05-16T04:27:32+5:30
फोटो मूल : मागणीच्या तुलनेत राज्याला कमी प्रमाणात लस मिळत असल्याने राज्यात लसींचा तुटवडा जाणवत आहे, परंतु येत्या आठवडाभरात ...
फोटो
मूल : मागणीच्या तुलनेत राज्याला कमी प्रमाणात लस मिळत असल्याने राज्यात लसींचा तुटवडा जाणवत आहे, परंतु येत्या आठवडाभरात लसींच्या तुटवड्याची समस्या सुटणार असून, मागणीप्रमाणे लसींची उपलब्धता होणार असल्याने १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना लसींचा लाभ मिळणार असल्याची माहिती पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.
मूल येथील काँग्रेस भवनात आयोजित लसीकरण नोंदणी सेवा केंद्राचे उद्घाटन शनिवारी ना.वडेट्टीवार यांचे हस्ते पार पडले. याप्रसंगी ते बोलत होते. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी तालुका काँग्रेस पार्टीच्या सहकार्याने स्थानिक काँग्रेस भवन येथे विनाशुल्क ऑनलाइन नोंदणी सेवा केंद्र सुरू केले आहे. यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत, संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे अध्यक्ष राकेश रत्नावार, नगरसेवक विनोद कामडी, लिना फुलझेले, गोंडवाना विद्यापीठ सिनेट सदस्य सुनील शेरकी, महिला काँग्रेस अध्यक्ष रूपाली संतोषवार, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पवन निलमवार, व्यंकटेश पुल्लकवा आदी उपस्थित होते.