आरक्षण सोडतीत दिग्गजांना फटका
By admin | Published: October 6, 2016 01:29 AM2016-10-06T01:29:38+5:302016-10-06T01:29:38+5:30
पुढील वर्षी होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी बुधवारी आरक्षण सोडत पार पडली.
जिल्हा परिषदेचे आरक्षण जाहीर : अनेकांना शोधावे लागणार नवीन क्षेत्र, महिलांची सदस्य संख्या वाढणार
चंद्रपूर : पुढील वर्षी होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी बुधवारी आरक्षण सोडत पार पडली. यात अनेक दिग्गज राजकारण्यांच्या बालेकिल्ल्याला सुरूंग लागले असून त्यांना नव्या क्षेत्राची वाट धरावी लागणार आहे. तर काही जणांचे क्षेत्र कायम राहिले आहे.
बुधवारी दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांच्या उपस्थितीत आरक्षण काढण्यात आले. यात चिमूर तालुक्यातील भिसी-आंबोली गणातून ओबीसी, शंकरपूर-डोमा सर्वसाधारण, शिरपूर-नेरी अनुसुचित जाती, मुरपार-खडसंगी सर्वसाधारण (महिला), मासळ बु.-मदनापूर सर्वसाधारण असे आरक्षण निघाले आहे. नागभीड तालुक्यातील कानपा-मौशी अनुसुचित जमाती, पारडी-बाळापूर बु. ओबीसी, गोविंदपूर-बाळापूर अनुसुचित जमाती, गिरगाव-वाढोना अनुसुचित जमाती महिला, ब्रह्मपुरी तालुक्यातील नान्हेरी सर्वसाधारण, पिंपळगाव-मालडोंगरी ओबीसी महिला, खेळमक्ता-चौगाण अनुसुचित जाती महिला, गांगलवाडी-मेंडकी अनुसुचित जाती महिला, आवळगाव-मुडझा सर्वसाधारण असे आरक्षण निघाले.
सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव-पळसगाव जाट सर्वसाधारण, गुंजेवाही-लोनवाही अनुसुचित जमाती महिला, रत्नापूर-शिवणी ओबीसी महिला, मोहाळी (नलेश्वर)-वासेरा सर्वसाधारण, भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा-मुधोली ओबीसी, कोकेवाडा तु.-नंदोरी बु. ओबीसी महिला, पाढळा-माजरी ओबीसी, कोंढा-घोडपेठ अनुसुचित जमाती, वरोरा तालुक्यातील खांबाळा-चिखणी सर्वसाधारण महिला, टेंभुर्डा-आंबामक्ता सर्वसाधारण, नागरी-माढेळी अनुसुचित जमाती महिला, चरूर खट्टी-सालोरी सर्वसाधारण महिला, शेगाव बु.-बोरळा अनुसुचित जमाती महिला असे आरक्षण निघाले आहे.
चंद्रपूर तालुक्यातील दुर्गापूर सर्वसाधारण महिला, बोर्डा-जुनोना सर्वसाधारण, उर्जानगर ओबीसी महिला, ताडाळी-पडोली अनुसुचित जमाती, घुग्घुस सर्वसाधारण महिला, नकोडा-मारडा अनुसुचित जाती, मूल तालुक्यातील राजोली-मारोडा सर्वसाधारण महिला, जुनासुर्ला-बेंबाळ अनुसुचित जमाती महिला, केळझर-चिचाळा अनुसुचित जाती, पोंभुर्णा तालुक्यातील देवाडा खु.-केमारा सर्वसाधारण, चिंतलधाबा-घोसरी ओबीसी, सावली तालुक्यातील अंतरगाव-निमगाव ओबीसी महिला, पाथरी-व्याहाड खु. अनुसुचित जमाती महिला, बोथली-कवठी ओबीसी महिला, व्याहाड बु.-हरांबा सर्वसाधारण, गोंडपिंपरी तालुक्यातील करंजी-खराडपेठ अनुसुचित जाती महिला, विठ्ठलवाडा-भंगाराम तळोधी अनुसुचित जाती महिला, तोहेगाव-धाबा सर्वसाधारण महिला असे आरक्षण निघाले आहे.
बल्लारपूर तालुक्यातील विसापूर-बामणी अनुसुचित जमाती, पळसगाव-कोठारी ओबीसी महिला, कोरपना तालुक्यातील पोळसा बु.-भोयगाव ओबीसी महिला, उपरवाही-नांदा ओबीसी, येरगव्हान-परसोडा सर्वसाधारण महिला, जिवती तालुक्यातील पाटण-शेणगाव सर्वसाधारण महिला, खळगी रामपूर-पुडीयालमौदा ओबीसी महिला, राजुरा तालुक्यातील गोवरी-सास्ती सर्वसाधारण, चुनाळा-विरूर स्टे. अनुसुचित जमाती, आरवी-पाचगाव अनुसुचित जाती, देवाळा-डोंगरगाव सर्वसाधारण महिला असे आरक्षण निघाले आहे. त्यामुळे आता काही सदस्यांमध्ये खुशी तर काहींमध्ये गम असे चित्र दिसून येत आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
या दिग्गाजांना फटका
बुधवारी घोषित झालेल्या आरक्षणाचा विद्यमान जिल्हा परिषद सदस्यांना चांगलाच फटका बसला असून सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनाही नवे क्षेत्र शोधण्याची पाळी आली आहे. शिक्षण सभापती देवराव भोंगळे यांचे क्षेत्र असलेल्या घुग्घुस गणातून सर्वसाधारण महिला असे आरक्षण निघाले आहे. तर काँग्रेसचे उपगटनेता विनोद अहीरकर यांचे क्षेत्र असलेल्या जुनासुर्ला-बेंबाळ गणातून अनुसुचित जमाती महिलेचे आरक्षण निघाले आहे. तसेच संदिप करपे यांच्या करंजी-खराळपेट क्षेत्रात अनुसुचित जाती, विजय देवतळे यांच्या नागरी-माढेळी क्षेत्रात अनुसुचित जाती महिला, शांताराम चौखे यांच्या दुर्गापूर क्षेत्रात सर्वसाधारण महिला, दिनेश चोखारे यांच्या ताडाळी-पडोली क्षेत्रात अनुसुचित जमाती, संदिप गड्डमवार यांच्या बोथली-कवठी क्षेत्रात ओबीसी महिला, अमर बोडलावार यांच्या विठ्ठलवाडा क्षेत्रात अनुसुचित जाती महिला, रागभाऊ टोंगे यांच्या विसापूर-बामणी क्षेत्रात अनुसुचित जाती, अविनाश जाधव यांच्या चुनाळा-विरूर स्टे. क्षेत्रात अनुसुचित जमाती असे आरक्षण निघाले आहे.