श्रीक्षेत्र रामदेगी, संघरामगिरीच्या विकासासाठी पालकमंत्र्यांना साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:32 AM2021-08-25T04:32:40+5:302021-08-25T04:32:40+5:30
चिमूर : तालुक्यातील रामदेगी परिसरात भरभरून निसर्गसौंदर्य आहे. पवित्र असे तीर्थक्षेत्र आहे. मात्र, शासन, लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेने या परिसराचा विकास ...
चिमूर : तालुक्यातील रामदेगी परिसरात भरभरून निसर्गसौंदर्य आहे. पवित्र असे तीर्थक्षेत्र आहे. मात्र, शासन, लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेने या परिसराचा विकास झाला नाही. या क्षेत्राचा विकास करावा, अशी मागणी मनसेचे उपजिल्हाप्रमुख तथा वाहानगावचे सरपंच प्रशांत कोल्हे यांनी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पांतर्गत श्रीक्षेत्र रामदेगी, संघरामगिरीचा समावेश आहे. निसर्गसौंदर्य असलेल्या तालुक्यातील रामदेगी देवस्थान क्षेत्राचा तीर्थक्षेत्र म्हणून योग्य प्रकारे विकास झाला नाही. स्मारके, तीर्थक्षेत्रांचा विकास करण्याकरिता केंद्र शासन कोट्यवधींचा निधी देते. मात्र, शासन, पुरातत्व विभाग तथा लोकप्रतिनिधीचे याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे तीर्थक्षेत्र रामदेगीचा विकास करावा, अशी मागणी सरपंच कोल्हे यांनी केली. पांदण रस्त्यांचे खडीकरण, सभागृह बांधकामासाठी निधी द्यावा, याकडेही लक्ष वेधले. याप्रसंगी बंडू गेडाम यांचीही उपस्थिती होती.
240821\img-20210822-wa0345.jpg
रामदेगीच्या विकासासाठी पालकमंत्री यांना निवेदन देताना प्रशांत कोल्हे