आरोग्य कर्मचाऱ्यांच्या वसाहतीला झुडूपांचा विळखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2020 12:14 AM2020-08-30T00:14:28+5:302020-08-30T00:16:21+5:30
सिंदेवाही येथे ग्रामीण रुग्णालय आहे. मात्र येथील कर्मचाऱ्यांची वसाहत लोनवाही ग्रामपंचायत परिसरात आहे. या वसाहतीमध्ये आरोग्य विभागाचे कर्मचारी तसेच १०८ रुग्णवाहिकेचे कर्मचारी वास्तव्यास आहेत. सध्यास्थितीत येथील कर्मचाऱ्यांची कोरोना ड्युटी लागत असल्याने ते वेळी-अवेळी घरीच येतात.
लोकमत न्यूज नेटवर्क
सिंदेवाही : तालुक्यातील लोनवाही परिसरात असलेल्या ग्रामीण रूग्णालयाच्या वसाहतीच्या परिसराला झुडूपाने विळखा घातला आहे. आरोग्य विभागाचे कर्मचारी कोरोना कर्तव्य बजावून वेळी-अवेळी घरी येतात. परिणामी सरपटणाऱ्या प्राण्यांपासून धोका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्वच्छता करावी, अशी मागणी होत आहे.
सिंदेवाही येथे ग्रामीण रुग्णालय आहे. मात्र येथील कर्मचाऱ्यांची वसाहत लोनवाही ग्रामपंचायत परिसरात आहे. या वसाहतीमध्ये आरोग्य विभागाचे कर्मचारी तसेच १०८ रुग्णवाहिकेचे कर्मचारी वास्तव्यास आहेत.
सध्यास्थितीत येथील कर्मचाऱ्यांची कोरोना ड्युटी लागत असल्याने ते वेळी-अवेळी घरीच येतात. मात्र वसाहतीचा परिसरात विविध प्रकारचे झुडपे तयार झाले असल्याने सरपटणाऱ्या प्राण्यांपासून धोका होण्याची शक्यता आहे. मात्र याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे.