झुडपांमुळे अपघाताचेप्रमाण वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:34 AM2021-09-09T04:34:47+5:302021-09-09T04:34:47+5:30
प्रवासी निवाऱ्यांची दुरूस्ती करा चंद्रपूर : जिल्ह्यातील काही गावांतील प्रवासी निवाऱ्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे प्रवाशांना पावसात भिजत उभे ...
प्रवासी निवाऱ्यांची दुरूस्ती करा
चंद्रपूर : जिल्ह्यातील काही गावांतील प्रवासी निवाऱ्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे प्रवाशांना पावसात भिजत उभे राहून बसची प्रतीक्षा करावी लागते. बहुतेकदा प्रवासी झाडाच्या सावलीचा आधार घ्यावा लागतो.
गावात स्वच्छता मोहिम राबवावी
चंद्रपूर : शहरात काही ठिकाणाणून कचऱ्याची विल्हेवाट योग्य प्रकारे होत नाही. अनेक ठिकाणी कचरा अस्ताव्यस्त पडलेला असतो. त्यामुळे घाणीचे साम्राज्य निर्माण होऊन डांसाचा वावर वाढला आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे.
सिग्नल सुरु करण्याची मागणी
चंद्रपूर : येथील काही चौकांतील ट्राफिक सिग्नल मागील अनेक वर्षापासून बंद आहे. त्यामुळे सिग्नल सुुरू करून दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.सिग्नल बंद असल्यामुळे अनेक वेळा अपघातही होत आहे.
लाभार्थी वेतनाच्या प्रतीक्षेत
चंद्रपूर : जिल्ह्यात श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी मानधनापासून वंचित आहे. त्यांना तातडीने वेतन देण्यात यावे, अशी मागणी आहे. काहींची संजय गांधी निराधार, श्रावणबाळ, वृद्धापकाळ योजनेसाठी निवड करण्यात आली. मात्र त्यांच्या खात्यात पैसेच जमा होत नसल्याचे लाभार्थ्यांचे म्हणणे आहे.
आधारकार्ड देण्याची मागणी
चंद्रपूर : तालुक्यातील अनेक गावातील नागरिकांना अद्याप आधारकार्ड प्राप्त न झाल्याने त्यांना विविध सोई सवलतींपासून वंचित रहावे लागत आहे. आता सर्व शासकीय कामात आधार कॉर्ड सक्तीचा करण्यात आला आहे.