रस्त्यावरील झुडपे ठरतेय वाहतूकदारास अडचणींचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:26 AM2021-05-22T04:26:48+5:302021-05-22T04:26:48+5:30
कोरपना : कोरपना तालुक्यात एक राष्ट्रीय, तीन राज्य, जिल्हा महामार्ग व अनेक ग्रामीण रस्ते आहे. मात्र प्रत्येक रस्त्यावर झुडपांनी ...
कोरपना : कोरपना तालुक्यात एक राष्ट्रीय, तीन राज्य, जिल्हा महामार्ग व अनेक ग्रामीण रस्ते आहे. मात्र प्रत्येक रस्त्यावर झुडपांनी रस्ते गिळंकृत केले आहे. त्यामुळे वाहतूकदार व नागरिकांना प्रवासात अडचणी येत आहे.
या झुडपांच्या व्यवस्थापनाकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण उपविभाग, सार्वजनिक बांधकाम उपविभाग, जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग या सर्वांचे दुर्लक्ष होत आहे. परिणामी या काटेरी झुडपांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. मात्र याकडे लक्ष द्यायला कुणालाच वेळ नसल्याचे दिसून येते. यात राजुरा - कोरपना - आदिलाबाद राष्ट्रीय महामार्ग , कोरपना - वणी , भोयगाव - गडचांदूर - जिवती , वनोजा - नांदा - गडचांदूर - देवाडा राज्य महामार्ग , पारडी - मुकुटबन, वणसडी - कवठाळा - पौनी , कोरपना - धनकदेवी - जिवती, कन्हाळगाव - चनई - मांडवा , खैरगाव - सावलहीरा, लोणी - पिपरी, दुर्गाडी - शिवापूर - थिप्पा , कोरपना - गांधीनगर - कोडशी बु , लालगुडा -नांदा - बाखडी आदी प्रमुख मार्गाचा समावेश आहे. वाढलेल्या झुडपांमुळे रात्रीच्या वेळीस प्रवास करताना अधिक जोखमीचे ठरते आहे. तसेच बऱ्याच रस्त्याच्या कडा ही खचल्या असल्याने अपघाताची शक्यता बळावली आहे. याच रस्त्याच्या बाजूला विद्युत लाईन आहे. परिणामी झुडपाचे घर्षण होऊन अनेकदा विद्युत पुरवठा खंडित होत आहे. परंतु यावर उपाययोजना मात्र होत नाही. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.