जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये शुकशुकाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2019 12:14 AM2019-03-01T00:14:43+5:302019-03-01T00:15:58+5:30
शासन दररोज नवीन परिपत्रक काढीत आहे. शेतमाल खरेदीला शासन व्यापाऱ्यांना थेट परवाना देत आहेत. त्यामुळे बाजार समितीच्या खरेदीवर कुठलेच नियंत्रण नसल्याने शेष मंदावला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : शासन दररोज नवीन परिपत्रक काढीत आहे. शेतमाल खरेदीला शासन व्यापाऱ्यांना थेट परवाना देत आहेत. त्यामुळे बाजार समितीच्या खरेदीवर कुठलेच नियंत्रण नसल्याने शेष मंदावला आहे. कर्मचाऱ्यांच्या नोकºया धोक्यात आल्या आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांना शासनाने शासकीय सेवेत सामावून घ्यावे, याकरिता जिल्ह्यातील सर्व १३ ही बाजार समिती कर्मचाºयांनी गुरुवारी संप पुकारला. सर्व कर्मचारी मुंबई येथील आंदोलनात सहभागी झाले. त्यामुळे बाजार समित्या कुलूपबंद होत्या. सर्व कामकाज ठप्प होते.
बाजार समितीच्या आवारात आजपर्यंत व्यापारी शेतमालाची खरेदी करीत असल्याने या खरेदीवर बाजार समितीचे नियंत्रण होते. त्यातून बाजार समितीला शेष मिळत होता. यातून बाजार समितीच्या कर्मचाºयांचे वेतन व इतर खर्च केला जात होता. वरोरा बाजार समितीमध्ये १३ स्थायी, २० अस्थायी व दोन हंगामी कर्मचारी कार्यरत आहे. शासन मागील काही महिन्यात दररोज नवनवी परिपत्रके काढत आहे. शासनाने व्यापाºयांना शेतमाल खरेदीचा थेट परवाना दिल्याने व्यापारी शेत मालाची खरेदी बाजार समितीच्या आवारात करीत नाही. त्यामुळे या खरेदीवर सध्या बाजार समितीचे नियंत्रण नाही. त्यामुळे बाजार समितीला मिळणाºया शेषबाबत शंका निर्माण झाल्या आहेत.
बाजार समितीला शेतमाल खरेदीचे नियंत्रण मर्यादित केले आहे. नाफेडनी मागील वर्षी तुरी चना, सोयाबीन खरेदी बाजार समितीच्या आवारात केली. त्याचाही शेष आजतागायत बाजार समितीला मिळाला नाही. त्यामुळे बाजार समित्यांची आर्थिक कोंडी होत आहे. यावर शासनाने तत्काळ तोडगा काढावा, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी लावून धरली आहे.
या बाजार समित्या होत्या कुलूपबंद
जिल्ह्यातील चंद्रपूर, गोंडपिपरी, राजुरा, कोरपना, पोंभुर्णा, मूल, सावली, नागभीड, सिंदेवाही, ब्रह्मपुरी, चिमूर, वरोरा व भद्रावती बाजार समिती कार्यालयांना गुरुवारी सकाळपासूनच कुलूप होते. येथील शेतमाल खरेदी-विक्री व उलाढाल थांबली. संपामुळे सर्व बाजार समित्यांमध्ये गुरुवारी शुकशुकाट पसरला होता.