जिल्हा रुग्णालयात सिकलसेल दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:19 AM2021-06-23T04:19:27+5:302021-06-23T04:19:27+5:30
चंद्रपूर : राष्ट्रीय आरोग्य अभियान, सिकलसेल आजार नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जागतिक सिकलसेल आजार नियंत्रण दिन कार्यक्रम जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. ...
चंद्रपूर : राष्ट्रीय आरोग्य अभियान, सिकलसेल आजार नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जागतिक सिकलसेल आजार नियंत्रण दिन कार्यक्रम जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांच्या मार्गदर्शनात जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमचंद कन्नाके, तर प्रमुख पाहुणे म्हणून रक्त संक्रमण अधिकारी डॉ. अनंत हजारे, डॉ. कल्पिता गावित, प्रा. मेघा कुलसंगे, जेसीआय आर्बीटचे अध्यक्ष हितेश नथवानी, अजय मार्कंडेवार आदी उपस्थित होते. सिकलसेल आजार अनुवंशिक असल्याने कोणताही सिकलसेल रुग्ण व वाहक व्यक्तीमुक्त होऊ शकत नाही. त्यामुळे आजाराच्या नियंत्रणाकरिता प्रत्येकाने लग्नापूर्वी तसेच गर्भवती महिलांनी सिकलसेल तपासणी करावी, त्यामुळे पिढीत हा आजार टाळता येतो, वाहक-वाहक व्यक्ती तसेच वाहकब ग्रस्त व्यक्तीमध्ये लग्न करु नये, असे आवाहन रक्त संक्रमण अधिकारी डॉ. अनंत हजारे यांनी केले. सर्व शासकीय आरोग्य संस्थेत मोफत सिकलसेल चाचणी करण्यात येत आहे, प्रत्येकांनी सिकलसेल चाचणी करण्याचे आवाहन जिल्हा सिकलसेल समन्वयक संतोश चात्रेशवार यांनी केले. यावेळी सिकलसेल योद्धा रूपल उराडे यांचा सत्कार करण्यात आला. यशस्वीतेसाठी डे केअर तत्रज्ञ अर्चना गावंडे, समुपदेशक भारती तितरे यांनी प्रयत्न केले. संचालन जिल्हा सिकलेल समन्वय चात्रेशवार यांनी केले.