सिद्धेश्वर मंदिराचा होणार जीर्णोद्धार; १४ कोटी ९३ लक्ष निधीची प्रशासकीय मान्यता 

By साईनाथ कुचनकार | Published: June 16, 2023 02:58 PM2023-06-16T14:58:42+5:302023-06-16T14:59:46+5:30

 १२ ते १३ व्या शतकातील मंदिर : सुधीर मुनगंटीवार यांचा पुढाकार

Siddheshwar temple to be restored; 14.93 crores administrative approval of funds | सिद्धेश्वर मंदिराचा होणार जीर्णोद्धार; १४ कोटी ९३ लक्ष निधीची प्रशासकीय मान्यता 

सिद्धेश्वर मंदिराचा होणार जीर्णोद्धार; १४ कोटी ९३ लक्ष निधीची प्रशासकीय मान्यता 

googlenewsNext

चंद्रपूर : राजुरा तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या देवाडा परिसरातील सिद्धेश्वर मंदिराचे जतन व दुरुस्तीसाठी १४ कोटी ९३ लक्ष ९९ हजार ७५३ रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. याबाबत पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने शासन निर्णय निर्गमित केला असून, राज्याचे सांस्कृतिक मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे या मंदिर परिसराचा जीर्णोद्धार होणार आहे.

महाराष्ट्र-तेलंगणा सीमावर्ती भागातील राजुरा तालुक्याच्या शेवटच्या टोकावर देवाडा परिसरात १२ व्या ते १३ व्या शतकातील श्री सिद्धेश्वर पुरातन हेमाडपंथी मंदिर असून, या परिसरात विविध लहान मोठ्या आकाराची मंदिरे आहेत. सिद्धोश्वर मंदिर परिसराचा जीर्णोद्धार करण्यासाठी माजी आमदार सुदर्शन निमकर यांच्या मागणीनुसार सांस्कृतिक कार्य मंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी १४ सप्टेंबर २०२२ रोजी सह्याद्री अतिथिगृहावर बैठक आयोजित केली होती. या बैठकीत महाराष्ट्र राज्य पुरातत्व व वस्तू संग्रहालयाचे संचालक यांना सिद्धेश्वर मंदिराला प्रत्यक्ष भेट देण्याचे, तसेच त्यासंबंधित आराखडा आणि प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार आता सिद्धेश्वर मंदिरासाठी १४ कोटी ९३ लक्ष निधीची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.

भाविकांमध्ये आनंद

श्रावण महिन्यात व शिवरात्रीला या मंदिरात उत्सव साजरा केला जातो. महाराष्ट्रातील तसेच तेलंगणातील हजारो भाविक मोठ्या श्रद्धेने दर्शनाला येतात. डोंगराच्या पायथ्याशी व निसर्गरम्य वातावरणात असलेल्या या मंदिर परिसराचा कायापालट होणे आवश्यक होते. आता या देवाडा परिसरातील पुरातन सिद्धेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार होणार असल्याने भाविकांनी समाधान व्यक्त केले आहे.

Web Title: Siddheshwar temple to be restored; 14.93 crores administrative approval of funds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.