वीज कंपनीच्या उपकार्यकारी अभियंत्याला घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 11:19 PM2019-07-22T23:19:38+5:302019-07-22T23:19:53+5:30

पावसाळा सुरू झाला असला तरी पाहिजे त्या प्रमाणात पाऊस झाला नाही. मागील दहा दिवसांपासून पावसाने हुलकावणी दिली आहे. त्यामुळे चिमूर तालुक्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे

Siege to Deputy Executive Engineer of Electricity Company | वीज कंपनीच्या उपकार्यकारी अभियंत्याला घेराव

वीज कंपनीच्या उपकार्यकारी अभियंत्याला घेराव

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
चिमूर : पावसाळा सुरू झाला असला तरी पाहिजे त्या प्रमाणात पाऊस झाला नाही. मागील दहा दिवसांपासून पावसाने हुलकावणी दिली आहे. त्यामुळे चिमूर तालुक्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यात आणखी भर म्हणजे वीज वितरण कंपनीचे भारनियमन. शेतकऱ्याने पेरलेले सोयाबीन, कापूस व धानाचे पऱ्हे कसे जगवायचे, या चिंतेत आहे. भारनियमनामुळे त्रस्त शेतकऱ्यांनी सोमवारला चक्क वीज वितरण कंपनीचे कार्यालय गाठून उपकार्यकारी अभियंता यांना घेराव घातला व नंतर भारनियमन बंद करण्याबाबत निवेदन देण्यात आले.
चिमूर तालुक्यातील विद्युत विभागांतर्गत येत असलेल्या सर्व सबस्टेशनमधून लोडशेडिंग सुरू आहे. या भागात कमी पावसामुळे दुष्काळसदृश्य परस्थिती निर्माण झाली असून शेतकऱ्यांची धान, कापूस, सोयाबीन व इतर पिके संकटात आली आहेत. सिंचनाची सोय असलेले शेतकरीही आपले पीक वाचवू शकत नाही. कारण वीज कंपनी मार्फत सुरू असलेल्या लोडशेडिंगमुळे शेतकरी संकटात सापडला आहे. तालुक्यातील जवराबोडी येथील शेतकऱ्यांनी वारंवार तक्रारी करूनसुद्धा कार्यालयांकडून त्यांना न्याय मिळाला नाही. व सौर पंपाची सक्ती न करता कृषिपंपासाठी अर्ज करण्याऱ्यां शेतकऱ्यांना विद्युत पुरवठा करण्यासाठी डिमांड द्यावे, यासह सुरू असलेले भारनियमन बंद करावे. यासह आदी मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी भैयासाहेब बेहरे व तहसीलदार संजय नागतीलक यांना देण्यात आले. यावेळी जि.प. सदस्य सतीश वारजुकर, माधव बिरजे, राम राऊत, संजय डोंगरे, विजय गावंडे, राजू चौधरी आदी उपस्थित होते.

Web Title: Siege to Deputy Executive Engineer of Electricity Company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.