विद्यापीठाच्या अन्यायाविरुध्द स्वाक्षरी अभियान
By admin | Published: August 20, 2014 11:26 PM2014-08-20T23:26:20+5:302014-08-20T23:26:20+5:30
गोंडवाना विद्यापीठाच्या अनागोंदी कारभाराविरुध्द राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात उपोषणाला बसले आहे. याकडे प्रशासनाचे लक्ष
उपोषण सुरु च : २१ ला महाविद्यालय बंदचा इशारा
चंद्रपूर : गोंडवाना विद्यापीठाच्या अनागोंदी कारभाराविरुध्द राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात उपोषणाला बसले आहे. याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी मुंडन आंदोलन करण्यात आले. तर बुधवारी विद्यार्थी स्वाक्षरी अभियान राबविण्यात आले.दरम्यान गुरवार २१ आॅगस्टला जिल्ह्यातील महाविद्यालय बंद आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
विद्यापीठाच्या निर्मितीपासूनच मायग्रेन प्रमाणपत्राची अट घालून विद्यार्थ्यांचा त्रास वाढविला आहे. विद्यापीठाने स्वत:च्या मर्जीने अभ्यासक्रम बदलविला. परंतु पुस्तके उपलब्ध करून दिली नाही. कोणत्याही विद्यापीठात एका दिवसात विलंब शुल्क पाच हजार रुपये नसेल ते या विद्यापीठाने विद्यार्थ्यांकडून आकारले आहे. योग्य प्रकारे सर्वर व नेटची व्यवस्था नाही, परंतु बहुतांश प्रक्रिया आॅनलाईन पद्धतीने राबविण्याची जबरदस्ती विद्यार्थ्यांवर लादली आहे.
विद्यापीठाच्या गलनाथ कारभारामुळे आतापर्यंत ५०० विद्यार्थ्यांवर अनुत्तीर्ण होण्याची वेळ आली आहे. अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचे परीक्षा शुल्क दोन हजार ३०० रुपये असून महाराष्ट्रातील इतर कोणत्याही विद्यापीठात एवढे परीक्षा शुल्क नाही. या विरोधात भटारकर यांनी आमरण उपोषण सुरु केले आहे.
विद्यापीठाला कुलगुरु नाही. ज्या प्रमुख व्यक्तीवर हजारो विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी आहे. त्यांचीच नेमणूक मागील सहा महिन्यापासून केली नाही. विद्यापीठाच्या गलनाथ कारभारामुळे अनेक विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.
या आंदोलनाच्या समर्थनार्थ जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी स्वाक्षरी अभियान राबविले. या अभियानामध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले. आंदोलनासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अमोल ठाकरे, शहर अध्यक्ष सुजित उपरे, संजय ठाकूर, सुमित मेश्राम, शुभम ढोरके, अभिजित खन्नाडे आदी आंदोलनासाठी विद्यार्थ्यांना एकत्र करीत आहेत. दरम्यान २१ आॅगस्टला जिल्ह्यातील महाविद्यालय बंद आंदोलन करण्यात येणार आहे. (नगर प्रतिनिधी)