मतदार जनजागृतीसाठी ब्रह्मपुरीत स्वाक्षरी मोहीम
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2024 17:59 IST2024-01-30T17:59:01+5:302024-01-30T17:59:10+5:30
ब्रह्मपुरी (चंद्रपूर ) : आगामी लोकसभा, विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने ७३- ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक कार्यक्रमाकरिता निवडणूक ...

मतदार जनजागृतीसाठी ब्रह्मपुरीत स्वाक्षरी मोहीम
ब्रह्मपुरी (चंद्रपूर ) : आगामी लोकसभा, विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने ७३- ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक कार्यक्रमाकरिता निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व निष्पक्षपणे पार पाडावी, या उद्देशाने मतदारांमध्ये जनजागृती करण्याकरिता गुरुवार दि. २५ रोजी राष्ट्रीय मतदार दिवसाचे औचित्य साधून ‘मी मतदानाचा हक्क बजावणारच’ अशा आशयाची स्वाक्षरी मोहीम तहसील कार्यालय ब्रम्हपुरी तसेच नगर परिषद कार्यालय ब्रह्मपुरी येथे घेण्यात आली.
शहराच्या प्रथम नागरिक नगराध्यक्षा रीता दीपक उराडे, उपाध्यक्ष अशोक रामटेके, सर्व सभापती तथा पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका, शहरातील प्रतिष्ठित नागरिक, कॉलेज युवक-युवती, अधिकारी-कर्मचारी यांनी मतदानाचा हक्क बजावण्याकरिता स्वाक्षरी करून सदर कार्यक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी ब्रह्मपुरी संदीप भस्के यांच्या मार्गदर्शनात तहसीलदार उषा चौधरी, पोलिस निरीक्षक अनिल जिट्टावार यांची प्रमुख उपस्थिती होती.
आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नवीन मतदार नोंदणीकरिता नागरिकांनी पुढे यावे, तसेच आपला मतदानाचा हक्क बजावावा. - अर्शिया जुही, मुख्याधिकारी न. पं. ब्रह्मपुरी तथा नोडल अधिकारी