ग्रामस्थ पितात आटलेल्या विहिरीतील गाळयुक्त पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2019 12:05 AM2019-05-10T00:05:11+5:302019-05-10T00:05:36+5:30

पाटण ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या जनकापूर, सितागुडा व लचमागुडयातील जलस्रोत पुर्णपणे कोरडे पडल्याने पाणी प्रश्न गंभीर बनला आहे. शासनाने खोदलेल्या विहिरीसुध्दा कोरड्या पडल्या आहे. असे असतानाही नाईलाजने या आटलेल्या विहिरीत गाळयुक्त पाणी काढून ते प्यावे लागत आहे.

Silt water from the well-drained wells | ग्रामस्थ पितात आटलेल्या विहिरीतील गाळयुक्त पाणी

ग्रामस्थ पितात आटलेल्या विहिरीतील गाळयुक्त पाणी

Next
ठळक मुद्देटँकर पुरविण्याची मागणी : दूषित पाण्यामुळे आरोग्य धोक्यात

लोकमत न्यूज नेटवर्क
जिवती : पाटण ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या जनकापूर, सितागुडा व लचमागुडयातील जलस्रोत पुर्णपणे कोरडे पडल्याने पाणी प्रश्न गंभीर बनला आहे. शासनाने खोदलेल्या विहिरीसुध्दा कोरड्या पडल्या आहे. असे असतानाही नाईलाजने या आटलेल्या विहिरीत गाळयुक्त पाणी काढून ते प्यावे लागत आहे. प्रशासनाने तातडीने टँकरने पाणी पुरवठा करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
यावर्षी समाधानकारक पाऊस न झाल्याने जिवती तालुक्यातील अनेक गावात पाणी टंचाईने डोके वर काढले आहे. अशीच स्थिती आता जनकापूर, सितागुडा व लचमागुडयात बघायला मिळत आहे. गावातील पिण्याच्या पाण्याचे स्रोत कोरडे पडले आहे. रखरखत्या उन्हात नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. डोंगरमाथ्यावर बसलेल्या जनकापूर गावाची लोकसंख्या ४१५ आहे. ६० घरांची वस्ती असलेल्या या गुडयात नेहमीच पाणी टंचाई जाणवत असून दरवर्षीच या गावात टँकरने पाणी पुरवठा केला जातो. मात्र यावर्षी अजूनही टँकरची सोय केली नसल्याने कोरडया विहिरीवर दिवसभर गाळयुक्त दूषित पाणी भरावे लागत आहे.

उन्हाळ्यात सार्वजनिक विहीर व जलस्रोत कोरडे पडले आहेत. गावात टँकरने पाणी पुरवठा करावा, अशी मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
- अंजना पवार पं.स.सदस्य, जिवती

Web Title: Silt water from the well-drained wells

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.