सिंदेवाही नगरपंचायतीची ३४ टक्केच कर वसुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:19 AM2021-06-10T04:19:59+5:302021-06-10T04:19:59+5:30
नगरपंचायतीचा कारभार चालविण्यासाठी मालमत्ता कर वसुली होणे महत्त्वाचे असते. कराच्या वसुलीतून येणाऱ्या उत्पन्नातून नगरपंचायतीद्वारे सामान्य निधीतून बरेच कामे केली ...
नगरपंचायतीचा कारभार चालविण्यासाठी मालमत्ता कर वसुली होणे महत्त्वाचे असते. कराच्या वसुलीतून येणाऱ्या उत्पन्नातून नगरपंचायतीद्वारे सामान्य निधीतून बरेच कामे केली जातात. यावर्षी कोरोनाचा राज्यात दुसऱ्यांचा शिरकाव झाल्याने सर्वसामान्यांचे कंबर मोडले आहे. लाॅकडाऊनमध्ये आर्थिक व्यवहार ठप्प होते, त्याचा परिणाम नगरपंचायतीच्या कारभारावर झाला आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी मे महिना संपूनही कर वसुली २० लाख रुपये म्हणजे ३४ टक्के झाली आहे. नळयोजनेची वसुली सात लाख रुपये म्हणजे २४ टक्केच झाल्याचे नगरपंचायतीतर्फे सांगण्यात आले.
कोट
कोरोनामुळे मालमत्ता कर वसुली झाली नाही. याचा परिणाम भविष्यात जाणवणार आहे. शहरवासीयांनी थकीत मालमत्ता कर भरून नगरपंचायती सहकार्य करण्याची गरज आहे.
- डाॅ. सुप्रिया राठोड, मुख्याधिकारी, नगरपंचायत, सिंदेवाही.