चिमूर अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात सिंदेवाही तालुक्याचा समावेश करू नये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:25 AM2021-02-12T04:25:52+5:302021-02-12T04:25:52+5:30
सिंदेवाही : महसूल व वन विभागाच्या २२ सप्टेंबर २०१९ च्या शासन निर्णयाद्वारे चिमूर येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय मंजूर करण्यात ...
सिंदेवाही : महसूल व वन विभागाच्या २२ सप्टेंबर २०१९ च्या शासन निर्णयाद्वारे चिमूर येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय मंजूर करण्यात आले असून या कार्यालयांतर्गत चिमूर, सिंदेवाही, ब्रह्मपुरी व नागभीड या तालुक्यांचा समावेश करण्यात आला. मात्र, या कार्यालयात सिंदेवाही तालुक्याचा समावेश करू नये, अशी मागणी जि. प. सदस्य रमाकांत लोधे यांनी केली आहे.
चिमूर अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात सिंदेवाही तालुक्याचा समावेश करण्याबाबत आमचा स्पष्ट आक्षेप असून यातून तालुक्याला वगळण्यात यावे. चिमूर हे सिंदेवाही तालुक्याच्या नागरिकांसाठी गैरसोयीचे होते. ब्रह्मपुरी अधिक सोयीचे ठरेल. तालुक्यातील बहुसंख्य विद्यार्थी शिक्षणासाठी ब्रह्मपुरीला शिकत आहेत. सर्वच बाबींनी ब्रह्मपुरी सोयीचे असल्याने सिंदेवाही तालुक्याचा ब्रह्मपुरीमध्ये समाविष्ट करण्यात यावा, या मागणीचे निवेदन जिल्हा परिषद सदस्य व तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमाकांत लोधे यांनी नायब तहसीलदार यांना दिले आहे.