सिंदेवाहीला लवकरच कृषी महाविद्यालय व कृषी अभियांत्रिकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:26 AM2021-02-07T04:26:54+5:302021-02-07T04:26:54+5:30

सिंदेवाही येथे विभागीय कृषी संशोधन केंद्राच्या प्रशासकीय इमारतीचा भूमिपूजन समारंभ पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते शनिवारी पार पडला. यावेळी ...

Sindevahi will soon have an agricultural college and agricultural engineering | सिंदेवाहीला लवकरच कृषी महाविद्यालय व कृषी अभियांत्रिकी

सिंदेवाहीला लवकरच कृषी महाविद्यालय व कृषी अभियांत्रिकी

Next

सिंदेवाही येथे विभागीय कृषी संशोधन केंद्राच्या प्रशासकीय इमारतीचा भूमिपूजन समारंभ पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते शनिवारी पार पडला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले, विद्यापीठाचे कार्यकारी सदस्य गणेश कंडारकर, स्नेहा हरडे, विनायक सरनाईक, मोरेश्वर वानखेडे, डॉ. व्ही के खर्चे, सरेंद्र काळबांडे, रजनी लोणारे, आशा गंडाटे, मंदा बाळबुद्धे, सहयोगी संशोधन संचालक डॉ. अनिल कोल्हे प्रामुख्याने उपस्थित होते.

पालकमंत्री वडेट्टीवार पुढे म्हणाले, शेतकऱ्यांच्या विकासासाठी येत्या चार वर्षात डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठाला मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात येऊन विद्यापीठाचा चेहरामोहरा बदलविण्यात येईल. सिंदेवाही येथील कृषी विद्यापीठाच्या संशोधन केंद्रासाठी १५ कोटी रुपये खर्चून नवीन प्रशासकीय इमारत उभी होणार आहे. यापूर्वीची इमारत १९११ ची होती १०९ वर्षानी नवीन इमारत बांधण्यात येत आहे, येथून विकासाचे नवीन पर्व सुरू होत असल्याचेही त्यांनी सांगितले. या केंद्राला उपसा सिंचन प्रकल्पासाठीदेखील निधी उपलब्ध करून देण्याचे त्यांनी आश्वासन दिले.

शेतकऱ्यांनी आधुनिक यंत्राद्वारे शेती करून आपला वेळ व श्रम वाचवावे, त्यातूनच शेतीवरील लागत व मनुष्यबळावरील खर्च कमी होऊन आर्थिक उत्पन्नात मोठ्या प्रमाणात वाढ होईल, हे सांगताना पालकमंत्री यांनी अमेरिकेत २०० एकर शेती चार लोक आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे करतात याचे उदाहरण दिले.

गोसेखुर्द सिंचन प्रकल्प पूर्ण झाल्यावर त्यातून निर्माण होणाऱ्या सिंचनाचा सर्वाधिक फायदा ब्रह्मपुरी विभागात होणार असून ब्रह्मपुरी विभाग महाराष्ट्रातील सर्वाधिक सिंचन क्षमता असलेला विभाग म्हणून नावारूपास येईल असेही प्रतिपादन पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले.

तत्पूर्वी कुलगुरू डॉ. भाले यांनी विद्यापीठाने विकसित केलेल्या धान पिकांच्या वाणांचा शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त वापर करण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले.

संचालन डॉ. सोनाली लोखंडे तर आभार डॉ. मदन वांढरे यांनी केले. कार्यक्रमाला विद्यापीठाचे शास्रज्ञ, अधिकारी व कर्मचारी तसेच शेतकरी उपस्थित होते.

Web Title: Sindevahi will soon have an agricultural college and agricultural engineering

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.