सिंदेवाही तहसीलवर काँग्रेसची धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 11:23 PM2017-09-25T23:23:00+5:302017-09-25T23:23:18+5:30
सिंदेवाही तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्यासाठी तथा केंद्र व राज्य सरकारने पेट्रोल, डिझेल, सिलिंडर गॅसचे दर वाढविले.
लोकमत न्यूज नेटवर्क
सिंदेवाही : सिंदेवाही तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्यासाठी तथा केंद्र व राज्य सरकारने पेट्रोल, डिझेल, सिलिंडर गॅसचे दर वाढविले. वीज बिलात भरमसाठ वाढ करून सर्वसामान्य जनतेची लूट सुरू केली असल्याबद्दल केंद्र व राज्यातील भाजपा सरकारचा निषेध करण्यासाठी तालुका काँग्रेस कमिटी सिंदेवाहीच्या वतीने सिंदेवाही तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
सदर मोर्चाचे नेतृत्व महाराष्टÑ विधीमंडळाचे उपगटनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले. जनसंपर्क कार्यालय ते शिवाजी चौक मार्गावरून तहसील कार्यालयापर्यंत घोषणा देत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राज्य सरकारचा निषेध केला.
निवडणुकीपूर्वी भाजपाने दिलेले आश्वासन व सत्तेत आल्यानंतर तीन वर्षात सरकारने जनतेसाठी काय केले याचा सविस्तर लेखाजोगा आमदार विजय वडेट्टीवार यांनी मांडला. भाजपाने तीन वर्षांच्या काळात पेट्रोल ६० रुपयांपासून ८० रुपयांपर्यंत आणले. स्वयंपाकाचे गॅस सिलिंडर ३५० रुपयांवरून ७८० रुपयांपर्यंत दरवाढ केली. डिझेलच्या किंमतीत प्रचंड वाढ केली. डिझेल ४५ रु. वरून ७० रुपयेपर्यंत वाढविण्यात आले. वीज देयकात वाढ करून सर्वसामान्य नागरिकांची लूट सुरू केली असून महागाईमुळे जनतेचे कंबरडे मोडले, असा आरोपही आ. वडेट्टीवार यांनी केला. शेतकºयांची सरसकट कर्जमाफीवरून शेतकºयांना कर्जमुक्त करण्यात यावे. कर्जमाफीसाठी लावलेली किचकट अट रद्द करण्यात यावी. अपुºया पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला असून शेतकरी संकटात सापडल्याने सिंदेवाही तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्यात यावा. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसीची अंमलबजावणी करण्यात यावी आदी मागण्या यावेळी लावून धरण्यात आल्या.यावेळी माजी आमदार सुभाष धोटे, जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, सुभाषसिंग गौर, सतिश वारजुकर, अरुण कोलते, माजी सभापती अरविंद जैस्वाल, रमाकांत लोधे, जि.प. सदस्य रूपा सुरपाम उपस्थित होते.