सिंदेवाहीत चक्काजाम

By admin | Published: July 17, 2014 12:00 AM2014-07-17T00:00:38+5:302014-07-17T00:00:38+5:30

तालुक्यातील अनेक समस्यांकडे महाराष्ट्र सरकारचे दुर्लक्ष होत आहे. या समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी भाजपाच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आले.

Sindhavit Chakkajam | सिंदेवाहीत चक्काजाम

सिंदेवाहीत चक्काजाम

Next

वाहतूक खोळंबली : कार्यकर्त्यांना अटक
सिंदेवाही : तालुक्यातील अनेक समस्यांकडे महाराष्ट्र सरकारचे दुर्लक्ष होत आहे. या समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी भाजपाच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनामुळे जवळपास तीन तास वाहतूक खोळंबली होती. कोरडा दुष्काळ जाहीर करणे, स्वतंत्र कृषी विद्यापीठ स्थापन करणे, गडबोरी-वासेरा-लाडबोरी- कळमगाव मोहाळी रस्त्याची दुरूस्ती करणे, कृषीपंपांना २४ तास वीज पुरवठा सुरू करणे, शेतकऱ्यांना विनामुल्य बियाणे पुरविणे, सिंदेवाहीला नगर परिषदेचा दर्जा देणे, ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहिरीचे बांधकाम करणे अशा विविध मागण्याचे निवेदन तहसीलदार मत्ते यांना देण्यात आले. आंदोलनादरम्यान भाजपाच्या शेकडो कार्यकर्त्यांना अटक करून नंतर सुटका करण्यात आली.
आंदोलनात आमदार अतुल देशकर, जि.प. सदस्य नागराज गेडाम, तालुकाध्यक्ष राजेंद्र पा. बोरकर, सरचिटणीस गोपीचंद गणवीर, प्रमुदास चौधरी, मुरलीधर मडावी, कमलाकर सिद्धमशेट्टीवार, गोपाल चिलबुले, वसंतराव गायकवाड, नामदेव लोखंडे, माजी सभापती अरविंद राऊत, किशोर भरडकर, दिवाकर पुस्तोडे तसेच शेकडो भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Sindhavit Chakkajam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.