एक तास चाललेल्या थराराचा ‘सिंघम’ने घटनास्थळीच बेड्या ठोकून केला अंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 05:00 AM2021-09-13T05:00:00+5:302021-09-13T05:00:48+5:30

अतिशय नियोजनबद्ध पध्दतीने दहशत माजविणाऱ्या विक्रम टाक व त्याच्या साथीदारांना ताब्यात घेतले. सुमारे एक तास हा थरार चालला. पोलीस उपनिरीक्षक वाघमारे यांच्या वेळेत झालेल्या एन्ट्रीने दहशत संपली. घटनास्थळ हे रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने या घटनेची माहिती रामनगरची पोलीस निरीक्षक धोबे यांना देण्यात आली. त्यांनीही वेळीच धाव घेऊन आरोपींना ताब्यात  घेत गुन्हा दाखल केला.

Singham ended the one-hour tremor on the spot | एक तास चाललेल्या थराराचा ‘सिंघम’ने घटनास्थळीच बेड्या ठोकून केला अंत

एक तास चाललेल्या थराराचा ‘सिंघम’ने घटनास्थळीच बेड्या ठोकून केला अंत

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : रात्री १०.१५ मिनिटांची वेळ. गुन्हेगारी प्रवृत्तीचा विक्रम टाक हा तरुण बाबूपेठ येथील आंबेडकर चौकातील अशोक स्पोर्टिंग क्लबजवळ आपल्या दोन-तीन साथीदारांसह हातात नंगी तलवार घेऊन उभा होता. या मार्गाने ये-जा करणाऱ्या वाहनांना थांबवून वाहनांच्या काचावर तलवारीने वार करून  फोडत होता. चाकूचाही धाक दाखवून मारहाण व लूटमार करीत होता. या प्रकाराने त्या परिसरात दहशतीचे वातावरण पसरले होते. अशातच युवा स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष सूरज ठाकरे व सहकारी राहुल चव्हाण हे राजुरा येथून पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम आटोपून या परिसरातून जाताना हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. त्यांनी लगेच चंद्रपूर शहर ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नीलेश वाघमारे यांना जुनी ओळख असल्यामुळे भ्रमणध्वनीवरून हा प्रकार कानावर घातला. नीलेश वाघमारे हे काही क्षणांतच ‘सिंघम’ स्टाइल घटनास्थळी आपल्या सहकाऱ्यांसह दाखल झाले. अतिशय नियोजनबद्ध पध्दतीने दहशत माजविणाऱ्या विक्रम टाक व त्याच्या साथीदारांना ताब्यात घेतले. सुमारे एक तास हा थरार चालला. पोलीस उपनिरीक्षक वाघमारे यांच्या वेळेत झालेल्या एन्ट्रीने दहशत संपली. घटनास्थळ हे रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने या घटनेची माहिती रामनगरची पोलीस निरीक्षक धोबे यांना देण्यात आली. त्यांनीही वेळीच धाव घेऊन आरोपींना ताब्यात  घेत गुन्हा दाखल केला.

एका बियरबारमध्येही केला राडा
विक्रम टाक व त्याच्या साथीदार त्याच परिसरातील एका बियर बारमध्ये नंगी तलवार घेऊन गेले होते. तेथे धिंगाणा घालून रस्त्याने जाणाऱ्या वाहनधारकांना तलवारीचा धाक दाखवून लूटमार करीत होते, असे पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे.

त्यांनी हद्दीचीही केली नाही पर्वा
अधिकार क्षेत्रातील हद्दीची पर्वा न करता आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचून पोलीस उपनिरीक्षक नीलेश वाघमारे यांनी आपले कर्तव्य बजावले. अशाच प्रकारे सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी कोणते क्षेत्र कुणाच्या हद्दीत येते, याची पर्वा न करता गुन्हेगारीचा नायनाट करून कायदा-सुव्यवस्था जर का राखून ठेवली तर मंदिरातून चप्पलही चोरी जाणार नाही, हे नाकारता येत नाही. या प्रकरणात सूरज ठाकरे यांनी जागरूकता दाखवली नसती तर हा प्रकार असाच सुरू राहिला असता.

 

Web Title: Singham ended the one-hour tremor on the spot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस