साहेब, अत्यसंस्काराला जातोय..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:20 AM2021-04-29T04:20:44+5:302021-04-29T04:20:44+5:30

कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी राज्यशासनाने लॉकडाऊन सुरू केले आहे. जिल्ह्याबाहेरील बससेवा बंद केली आहे. जिल्ह्यातील जिल्ह्यात अत्यावश्यक सेवेत ...

Sir, going to the funeral .. | साहेब, अत्यसंस्काराला जातोय..

साहेब, अत्यसंस्काराला जातोय..

Next

कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी राज्यशासनाने लॉकडाऊन सुरू केले आहे. जिल्ह्याबाहेरील बससेवा बंद केली आहे. जिल्ह्यातील जिल्ह्यात अत्यावश्यक सेवेत असणाऱ्यांना बससेवेने प्रवास करता येणार आहे. तसेच ज्या नागरिकांना बससेवेने प्रवास करायचे आहे त्यांना अत्यावश्यक सेवेचा पास जिल्हा प्रशासनाकडून काढणे गरजेचे आहे. असे असतानाही अनेकजण नानाविध कारणे पुढे करून एसटीने प्रवास करीत असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये विशेषत: एखाद्या ग्रामीण भागातून शहरात येणाऱ्या बससाठी तब्येत बरी नसल्याने दवाखान्यात जातोय, कधी जवळच्या नातेवाईकाला रुग्णालयात भेटायला जातो. तर कधी अंत्यसंस्काराला जातोय, अशी कारणे पुढे करून बसने प्रवास करतात. ही कारणे ऐकल्यावर बसचालकही बिनादिक्कत बसमध्ये प्रवेश देतो. काही वाहक प्रवाशांकडून पास मागत असल्याने वाहक व प्रवाशांमध्ये वाद होत असल्याचेही चित्र आहे.

बॉक्स

सध्या संचारबंदीत अत्यावश्यक सेवेत असणाऱ्या प्रवाशांनाच प्रवासाची परवानगी आहे. प्रवाशांचे ओळखपत्र पाहून बसमध्ये प्रवास दिला जातो. ओळखपत्र नसेल तर प्रवास करू दिला जात नाही. मात्र ज्यांच्याकडे प्रवासासंदर्भातील कुठलाही पास नाही त्या प्रवाशाला प्रवासास परवानगी मिळत नसल्याने वाहक व त्या प्रवाशात वाद होत आहे.

बॉक्स

प्रवाशांकडून तीच ती कारणे

लॉकडाऊन सुरू झाल्याने नियमित प्रवास करणाऱ्यांना अडचणी निर्माण झाल्या आहेत. मात्र अनेकजण विविध कारणे पुढे करुन प्रवास करीत आहे. त्यामध्ये विशेषत: नातेवाईकांचा मृत्यू झाल्याने अंत्यसंस्कारासाठी जात आहेत. जवळचा नातेवाइक भरती असल्याने रुग्णालयात त्याला भेटण्यासाठी जात आहे. तब्येत बरी नसल्याने डॉक्टरांना दाखवायला जात आहे, अशी कारणे सांगून प्रवास करीत आहेत.

बॉक्स

वरोरा-चंद्रपूर मार्गावर गर्दी

सद्यस्थितीत आगारातून मोजक्या बस सोडण्यात येत आहेत. त्यापैकी वरोरा-चंद्रपूर मार्गावर काही प्रमाणात प्रवासी आढळून येतात. याउलट इतर बसमध्ये अत्यल्प प्रवासी प्रवास करीत आहेत. बहुतांश प्रवाशांकडे अत्यावश्यक सेवेतील पासून दिसून येतो.

बॉक्स

जिल्ह्यातील एकूण आगार

बसेस चालविल्या जातात

१५

प्रवास करणाऱ्यांची संख्या

१५०

Web Title: Sir, going to the funeral ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.