रक्षाबंधनाला बहीण पाहतेय भावाची वाट...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:31 AM2021-08-22T04:31:15+5:302021-08-22T04:31:15+5:30
प्रकाश काळे गोवरी : घरून अचानक एके दिवशी निघून गेलेला भाऊ तब्बल तीन वर्षे होऊनही अजूनही घरी परतला नाही. ...
प्रकाश काळे
गोवरी : घरून अचानक एके दिवशी निघून गेलेला भाऊ तब्बल तीन वर्षे होऊनही अजूनही घरी परतला नाही. आपला पती, मुलगा, भाऊ घरी येईल, या एकाच आशेवर घरातील मंडळी वाट पाहत आहे. रविवारी सर्वत्र बहीण-भावाच्या रक्षाबंधनाचा पवित्र सण आनंदात साजरा होत असताना ही बहीण तीन वर्षांपासून भावाची वाट पाहत आहे. आपला भाऊ या रक्षाबंधनाला तरी परत येईल, अशी अपेक्षा तिला आहे.
राजुरा तालुक्यातील गोवरी येथील जयंद्र बापूजी पिंपळकर (३८) हा तीन वर्षांपूर्वी अचानक घरून निघून गेला. कुटुंबीयांनी सर्वत्र जयंद्रचा शोधाशोध केला. मात्र कुठेच शोध लागला नाही. त्यानंतर आईवडिलांनी आपला मुलगा हरविल्याची रीतसर तक्रार राजुरा पोलिसात दाखल केली होती. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. मात्र जयंद्रचा कुठेच शोध लागला नाही. आपला पती, मुलगा, भाऊ तीन वर्षांपासून घरी परतला नाही म्हणून कुटुंबीय चिंतेत आहे. जयंद्रला दोन चिमुकली मुले आहेत. मुलांचा भार पत्नीवर आहे. म्हातारे आईवडील आहेत. मात्र जयंद्र अचानक निघून गेल्याचे दुःख कुटुंबीयांवर आहे. आज रक्षाबंधनाचा पवित्र सण, बहीण आपल्या भावाला प्रेमाने राखी बांधत असते. आपला भाऊ यावेळी तरी रक्षाबंधनाला घरी परत येईल यासाठी बहीण सुमनबाई व इतर बहिणी भावाची सारखी वाट पाहत आहेत. आपल्या भावावर कोणतेही संकट येऊ नये यासाठी बहीण सदैव देवाला साकडे घालत असते.
210821\img_20210821_130107.jpg
रक्षाबंधनाला बहीण पाहतेय भावाची वाट...!