नेरी-सिरपुर मार्गासाठी ठिय्या आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:25 AM2021-03-07T04:25:27+5:302021-03-07T04:25:27+5:30
पळसगाव (पिपर्डा) : नेरी-सिरपूर मार्गाचे काम हे अतिशय कासवगतीने सुरू असून रस्ता पूर्ण उखडून त्यावर गिट्टी टाकून ठेवल्यामुळे वाहतुकीचा ...
पळसगाव (पिपर्डा) : नेरी-सिरपूर मार्गाचे काम हे अतिशय कासवगतीने सुरू असून रस्ता पूर्ण उखडून त्यावर गिट्टी टाकून ठेवल्यामुळे वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला आहे. या मार्गाचे काम जलदगतीने करण्याच्या मागणीसाठी प्रहारच्या वतीने रस्त्यावर ठिय्या आंदोलन करण्यात आले.
वास्तविक नियमानुसार एका बाजूने रास्ता खोदून काम पूर्ण करायला पाहिजे होते. पण तसे न करता संपूर्ण रस्ता उखडून ठेवला आहे. त्यामुळे वाहनाचे टायर फुटणे, ब्रेक डाऊन होणे, स्लिप होऊन पडणे अशा अनेक बाबी घडत आहेत. काम तात्काळ पूर्ण करावे, या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्ष प्रेरित प्रहार वाहन चालक-मालक संघटनेच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी प्रवीण वाघे, सचिन वाघे, नंदू निकोडे, संजय दडमल, दर्या वाघमारे, प्रवीण बोरसरे, मुन्ना बन्सोड, सुमित दंडारे, आशिष कामडी, विपीन कामडी, अनिल चाफले, अक्षय कामडी, किशोर पिसे, शुभम मोरे आदी उपस्थित होते.